“तिसऱ्या आघाडीनं काहीही फरक पडत नाही, येणार तर मोदीच”

मुंबई | राज्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्या बैठकीची चर्चा सुरु आहे. या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनं राजकीय वर्तुळातील हालचाली वाढल्याचं पहायला मिळत आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या तिसऱ्या आघाडीच्या चर्चा रंगल्या आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक पार पडली. जवळपास दीड तासभर ही बैठक चालली.

आज काॅंग्रेसला वगळून बैठक झाल्या आहेत त्यामुळे अनेक प्रश्नांचा तोंड फुटलं आहे. अशातच आता या भेटीलर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तेलगंणाचे सीएम केसीआर महाराष्ट्रात येऊन आपले सीएम उद्धव ठाकरे यांना भेटले आणि त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली तरी एनडीएला काहीही फरक पडणार नाही, केंद्रात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एनडीएच सत्तेत येणार, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली आहे.

‘केसीआर यांचं प्रभावक्षेत्र फक्त तेलंगणा पुरतंच मर्यादित आहे, तिसऱ्या आघाडीसाठी त्यांनी राजकीय पुढाकार घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, असंही आठवले यांनी म्हटलं.

महाराष्ट्रातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. सर्वच पक्षांचे नेते अत्यंत चुकीच्या पद्धतीने एकमेकांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण बिघडल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “देशातील परिवर्तनच्या लढ्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा”

  Uddhav Thackeray: “सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही”

  “उद्धव साहेब, सनम हम तो डूबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे”

  मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र, दिल्या ‘या’ सूचना

  ‘चौकशी होणार कळल्यामुळे संजय राऊत सैरभैर झालेत, त्यांना आवरा’