मुव्ही माफियांच्या भितीनं ‘या’ अभिनेत्यानं केला सिक्रेट काॅल, कंगनाचा धक्कादायक खुलासा

मुंबई| अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. ती नेहमी कोणत्या न कोणत्या काराणावरुन कोणाशी न कोणाशी पंगा घेताना दिसते. आपल्या वादग्रस्त ट्विटमुळं कंगना चर्चेचा विषय बनत असते. तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे कंगनाला अनेक वेळा ट्विटरचा फटका बसला आहे. यामुळे कंगना भरपूर वेळेस ट्रोल झाली आहे. यातच आता कंगना रणौत एका नवीन गोष्टीसाठी चर्चेत आली आहे.

कंगना अनेक मुद्यांवर आपलं अतिशय स्पष्ट मत मांडत असते. हल्लीच कंगनाने सोशल मीडियावर मोठा खुलासा केला आहे. कंगनाने केलेल्या या खुलासामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

कंगना नेहमीच बॉलिवूडमधील मूव्ही माफिया आणि घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवताना दिसते. नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये कंगनानं अक्षय कुमारकडून तिला सीक्रेट कॉल आल्याचं म्हटलं आहे.

कंगना रणौतने पटकथा लेखक अनिरुद्ध गुहा यांच्या एका ट्विटला उत्तर देताना बॉलिवूडवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. बॉलिवूडमध्ये मूव्ही माफियांची दहशत असल्याने अनेक बडे कलाकार माझं जाहीरपणे कौतुक करायलाही घाबरत असून ते मला गुपचूप फोन करत असल्याचं कंगना म्हणाली आहे. यामध्ये तिने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचं देखील नाव घेतलं आहे.

अनिरुद्ध गुहा यांनी एका ट्विट करत कंगनाचं कौतुक केलं आहे. बॉलिवूडच्या विरोधात जाणं तुम्हाला धोक्याचं ठरू शकतं अशी एक पोस्ट अनिरुद्ध यांना दिसली. या पोस्टला रिट्विट करत ते म्हणाले, ” कंगना रणौत याला अपवाद आहे, पिढीमध्ये एकदाच होणारी अभिनेत्री.” असं ते म्हणाले आहेत.

कंगनानं अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट करत तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं कि, ‘बॉलिवूडमध्ये शत्रू एवढे आहेत की, काही लोकांना मात्र बिनधास्तपणे कौतुक करणंही कठीण जात आहे. मला अनेक सीक्रेट कॉल्स आणि मेसेज येतात. ज्यात अक्षय कुमारसारख्या मोठ्या स्टार्सचासुद्धा समावेश आहे. ज्यांनी ‘थलायवी’च्या ट्रेलरनंतर माझं खूप कौतुक केलं पण ते दीपिका आणि आलियाच्या चित्रपटांप्रमाणे माझं बेधडकपणे कौतुक करू शकत नाही. कारण बॉलिवूडमध्ये मूव्ही माफियाची दहशत आहे.’

त्यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट केलं आहे. कंगना तिच्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणाली आहे. ” कलेशी संबधित या क्षेत्राचं उदिष्ट कलाच असायला हवं होतं. पावरच्या या खेळात आणि राजकारणात सामील न होता, खास करून जेव्हा सिनेमाची वेळ येते. माझ्या राजिकय आणि आध्यामिक विचारांवरून मला लक्ष करून माझा छळ करू नये आणि असं जर केलं तर अर्थातच मी जिंकेन.” अशा आशयाचं ट्विट तिने केलं आहे.

आता कंगनाचा हा दावा कितपत खरा आहे, ते फक्त अक्षय कुमार स्वत:च सांगू शकतो आणि तो अशा चित्रपट माफियांना खरोखरच घाबरत आहे की नाही, याचे खरे उत्तर केवळ स्वतः अक्षयच देऊ शकतो.

दरम्यान, कंगनाच्या कामाविषयी बोलायं झालं तर कंगना लवकरच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

थलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेत्या असा 30 वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये जयललिता यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांनी मिळवलेलं यश चित्रीत करण्यात आलं आहे. हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधून जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

‘या’ चित्रपट दिग्दर्शकाच्या पत्नि आणि मुलीची…

इंधन कंपन्यांच्या ‘या’ मोठ्या निर्णयाने…

‘हा’ तरुण केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेला अन् खुर्चीवर बसताच रडू लागला; पाहा मजेशीर व्हिडीओ

ऐन लग्नसराईच्या काळात सोनं 50 हजारापार जाण्याची शक्यता, वाचा आजचा दर

अरे वाह! या’ स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कुटर विषयी तुम्हाला माहीत आहे का? नक्की वाचा