Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

सर्वांच्या लाडक्या प्रभू देवाचं अखेर ठरलं! वाचा कोणाबरोबर घेतोय प्रभू सात फेरे?

मुंबई| सिनेसृष्टीतील कलाकार आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय असतात. सध्या अशीच चर्चा सुरू आहे ती कोरिओग्राफर आणि अभिनेता प्रभुदेवा याची. प्रभू दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रभू देवाचं नाव आज जगातील टॉप कोरिओग्राफर्समध्ये घेतलं जातं. याशिवाय तो उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शकही आहे. काही वर्षांपूर्वी प्रभू देवाने पत्नी रामलता हिला घटस्फो.ट दिला होता.

दोघांमध्ये अनेक वर्ष वा.द सुरू होते. यानंतर अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी तो भाचीच्या प्रेमात पडला आहे, अशी चर्चा सुरू होती. मात्र, या सगळ्या अफवा असून प्रभूदेवा मुंबईतील एका फिजीओथेरपिस्टसोबत लग्न करणार असल्याचं आता बोललं जात आहे.

पाठीला दुखापत झाल्यामुळे प्रभूदेवा या फिजीओथेरपीस्टकडे उपचार घेत होता. त्याच काळात या दोघांचं सूत जुळलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आता समोर आलं आहे.

दरम्यान, 1995 मध्ये प्रभुदेवाने रामलताशी लग्न केले होते. रामलता मुस्लिम धर्माची होती. मात्र, तिने लग्नानंतर हिंदू धर्म स्वीकारला. या दोघांना तीन मुलगे होते पण मोठा मुलगा विशालचा 2008 मध्ये कर्करोगाने मृ.त्यू झाला.

तसेच प्रभुदेवा आणि अभिनेत्री नयनताराच्या नात्याबद्दल देखील बऱ्याचवेळा बोललं गेलं. ‘विल्लु’ या तमिळ चित्रपटात प्रभुदेवाने नयनताराला नृत्यदिग्दर्शन केले होते. यानंतर दोघांमध्येही प्रेम वाढत गेलं होतं. मात्र, या दोघांनीही प्रेम कबूल केले नाही किंवा कधीही नाकारले नाही.

2010 मध्ये प्रभुने नयनतारासोबतच्या नात्यास सहमती दर्शविली आणि लग्न करण्याचा मुद्दा बनवला. रामलताला नयनतारा आणि प्रभू यांच्यातील नात्याबद्दल माहिती मिळाली. यानंतर प्रभूने घटस्फो.टासाठी अर्ज दाखल केला होता.

मात्र, रामलताने घटस्फो.टास नकार दिला होता. पण नंतर 2011 मध्ये त्यांच्या नात्याबद्दल झालेल्या गदारोळानंतर रामलताने लग्न संपवले.

प्रभु सध्या सलमान खान, दिशा पटानी आणि रणदीप हूडाच्या ‘राधे मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. एवढेच नाही तर दक्षिणमधील अनेक चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता म्हणून ‘पोन मनिकवेल’ त्याचा 50 वा चित्रपट आहे. या चित्रपटात तो प्रथमच पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बहिणीचा ‘तो’ सेक्सी व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफ देखील अवाक् झाला!

कंगना पुन्हा बरळली! ‘या’ बड्या क्रिकेटपटूला गंभीर सवाल करत म्हणाली…

अभिनेत्री पूनम पांडे गरोदर असल्याचं ते वृत्त खोटं? पूनम स्वतः म्हणाली…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ व्यवसायाबद्दल किरीट सोमय्या यांचा धक्कादायक गौप्यस्फोट!

धक्कादायक! ‘सुशांत प्रकरणामागे अक्षय कुमार देखील आहे?’