कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘या’ अभिनेत्यांनं विकली बाईक

मुंबई| सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे.

अशा संकट काळात अनेकजण पुढे येऊन मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे. अशातच अभिनेता हर्षवर्धन राणे याने कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी आपली बाईक विकली आहे.

अभिनेता हर्षवर्धन राणे सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळतो. हर्षवर्धनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या स्टाईलिश बाईकसोबतचा एक फोटो शेअर केलाय. ज्यात त्याने असे लिहिलेले कॅप्शन लिहिले आहे, ‘मी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या बदल्यात माझी बाईक देतोय. हे गरजूंसाठी उपयोगी ठरेल.

पुढे त्याने लिहिलं आहे, ‘हैद्राबाद मध्ये कुठे सगळ्यात चांगले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मिळतील याची माहिती मला द्या’. असही त्याने म्हटलं. हर्षवर्धनचा हा निर्णय सगळ्यांनाच भावला आहे. तर अनेकांनी त्याच्या या पोस्ट नंतर त्याचं कौतुक केलं आहे.

हर्षने 2010 मध्ये रिलीज झालेल्या तेलगू फिल्म ‘थकीता थकीता’ ने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनला प्रसिद्धी मिळाली होती.  अनेक तेलुगू चित्रपटांतही तो दिसला आहे.

हर्षवर्धन राणे लवकरच ‘कुन फाया कुन’ चित्रपटात दिसणार आहेत. त्याचबरोबर तो ‘कून फाया कून’ या बॉलिवूड चित्रपटातही झळकणार आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

एक समोर, एक शेजारी मगरींनी आडवला महिलेचा रस्ता त्यानंतर जे…

कोरोना योद्धाला सलाम! कोरोनाने आई, वडिल, भावाचा मृत्यू तरीही…

चक्क लांडग्याने सिंहाची शेपटी खेचली अन्…, पाहा व्हिडीओ

IPL 2021: पंजाब किंग्सचा आरसीबीवर दणदणीत विजय

कौतुकास्पद! वाॅकरशिवाय चालताही न येणारा ‘हा’…