Top news मनोरंजन

सलमानबर काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीनं चित्रपट सृष्टीला केलं अलविदा

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता बॉलिवूड इंडस्ट्रीतून आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री सना खान हिने चित्रपट सृष्टीला अलविदा केल्याची माहिती तिनं दिली आहे. सना खानने चित्रपट सृष्टीला बाय बाय करत धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे.

सनानं आपल्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिनं ‘जय हो’ या चित्रपटात सलमानची सह अभिनेत्री म्हणून देखील काम केलं आहे. या चित्रपटातील सनाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ‘जय हो’ चित्रपटापूर्वी सना ‘बिग बॉस’च्या सहाव्या पर्वात देखील दिसली होती.

मात्र, आता सनानं चित्रपट सृष्टीला अलविदा केल्यानं तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. सनानं सोशल मीडियावरून यासंबंधित माहिती दिली आहे. यासंबंधित तिनं ट्वीटरवर लांबलचक पोस्ट लिहित काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

सर्व भाऊ आणि बहिणींना मी विनंती करते की इथून पुढे मला चित्रपट सृष्टीतील कोणत्याही कामासाठी बोलावू नये. आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम आणि सहकार्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे, असं सनानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हे आयुष्य प्रत्यक्षात मृ.त्युनंतरचे जिवन सुधारण्यासाठी आहे. माणूस जेव्हा विधाताच्या आज्ञेनुसार जगेल तेव्हाच त्याचे जिवन सार्थकी लागेल. जिवनात केवळ संपती कमवणे याला जिवनाचं उद्दिष्ट माणू नका. आपले ध्येय सिद्ध करा. मानवतेचं रक्षण करा, असं सनानं सांगितलं आहे.

तसेच आज मी इथे जाहीर करते की, आजपासून मी चित्रपट सृष्टी सोडत आहे. आजपासून मी माझ्या विधात्याच्या आज्ञेचं पालन करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे मी चित्रपट सृष्टीला आता अलविदा करत आहे, असंही सनानं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सनाची ही पोस्ट सध्या प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे. सनाचे अनेक चाहते तिच्या या निर्णयामुळे नाराज झाले आहेत. सोशल मीडियावरून सनाचे अनेक चाहते तिला याबाबत प्रश्न विचारत आहेत.

दरम्यान, सना खान एक उत्तम डान्सर देखील आहे. तसेच सना अभिनयासोबतच मॉडेलिंग देखील करत होती. तिनं आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपट सृष्टीत खूप लवकर यश मिळवलं होतं.

सनानं 50 पेक्षा अधिक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. जय हो चित्रपटानंतर सना चित्रपट सृष्टीत दिसली नव्हती. मात्र, आता अचानक तिनं चित्रपट सृष्टी सोडत धर्माच्या मार्गावर चालणार असल्याचं जाहीर केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! सुशांत प्रकरणी तपास करणाऱ्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात त.क्रार दाखल!

रेखानं ‘या’ कारणाने बहिणीला चित्रपट सृष्टीत येवू दिलं नाही

सुशांत प्रकरणी बोलताना आता उर्वशीनंही सांगितलं पडद्यामागचं सत्य म्हणाली…

रेखा सध्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावते? वाचा काय म्हणाली होती रेखा

चित्रपट सृष्टीवर पुन्हा पसरली शोककळा! आणखी एका बड्या दिग्दर्शकाचं नि.धन