अहमदनगर| काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या महाभरती मोहीमेत आणखी एका भाजप नेत्यानं प्रवेश केला आहे. सुरु असलेल्या महाभरती मोहीमेत आज जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सीताराम पाटील गायकर यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांची साथ सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील व इतर नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. गायकर व स्थानिक इतर पदाधिकारी राष्ट्रवादीत जात असल्याने हा पिचड पिता-पुत्रांना मोठा धक्का मानला जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजीमंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडणार असा अंदाज बांधून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या नेत्यांमध्ये मधुकर पिचड आणि सीताराम गायकर यांचा समावेश होता.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या पाठिंब्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सीताराम गायकर हे बिनविरोध निवडून आले होते. तेव्हापासूनच सीताराम गायकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार, अशी चर्चा रंगली होती. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे. सीताराम गायकर यांच्यासह अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे 9 सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
दीड वर्षे उलटल्यानंतर गायकर यांनी पिचड पिता-पुत्रांची साथ सोडून पुन्हा एकदा हाती घड्याळ बांधण्याचे ठरवले आहे. त्यानुसार मंगळवारी त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या! तांदळाच्या पाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे
व्हायचं होतं पत्रकार झाला अभिनेता, वाचा ‘या’ अभिनेत्याचा किस्सा
वाढदिवसाच्या दिवशी आमिर खानचा सोशल मीडियाला रामराम, शेअर केली ‘ही’ शेवटची पोस्ट
तिनं तरुणाला खुलेआम प्रपोज केलं, पण चांगलंच महागात पडलं; पाहा व्हिडीओ
स्टेजवरंच उर्वशीसोबत जे घडू नये ते घडलं, ड्रेस खाली सरकला अन् मग…; पाहा व्हिडीओ