पुन्हा नव्या डिझाईनमध्ये लाँच होणार ‘ही’ गाडी, पाहा व्हिडीओ

मुंबई | अनेकांना आपल्या आयुष्यात काही ना काही करण्याची इच्छा असते. कोणती ना कोणती स्वप्न असतात. त्याचप्रमाणे काहींना चांगलं घरं घेण्याचे स्वप्न असते. परंतू त्यातील अनेकांचे एक मोठी गाडी घेण्याचे स्वप्न असेत.

बऱ्याच लोकांना गाड्यांबद्दल जाणून घेण्यास खूप रूची असते. त्या गाड्यांची किंमत, त्यांचे फिचर्स काय आहेत. ती गाडी किती मायलेज देती. इत्यादी गोष्टींची माहिती जाणून घेण्याची त्यांची फार इच्छा असते. 

अशातच किया मोटार्सने त्यांच्या सोशल मीडिया आकाऊंटवरून एका नवीन प्रोडक्टबद्दल माहिती दिली आहे. त्यासंबंधी एक टीझरही पोस्ट केला आहे. टीझर पोस्ट करताना The one who asked why? असं कॅप्शन दिलं आहे.

या टीझरमध्ये सायनटिस्ट न्यूटनच्या डिस्कव्हरी ऑफ ग्रॅव्हिटीचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यावरून हे लक्षात येते की, हा टीझर किया साल्टॉस ग्रॅव्हिटी एडिशनचा असू शकतो, ही किया मोटार्सची नवीन कार आहे. किया मोटार्सने 2020 जूलैमध्ये दक्षिण कोरियामध्ये हे एडिशन लाँच केलं होतं.

किया साल्टोज ग्रॅव्हिटी मध्ये बेस्पोक, थ्री डायमेंशनल डिझाईन एलिंमेटसह क्रोम्ड फ्रंट ग्रिल मिळेल. 18 इंचाचे मशीन्ड अलॉय व्हिल्स मिळतील. कंपनीने या कारच्या ORVM, डोर गार्निश आणि रियर स्किड प्लेटमध्ये सिल्व्हर फिनिश दिले आहे.

किया साल्टोज ग्रॅव्हिटी एडीशनमध्ये 10.25 इंचाची टचस्कीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, UVO कनेक्ट कार टेक, डिजिटल इस्ट्रुमेंटल कन्सोल, प्रीमियर बोस साऊंड सिस्टिम असणार आहे. तसेच ऑटोमॅटीक एसी, वायरलेस फोन चार्जर देण्यात येणार आहे.

एसयूव्हीला लेन केम असिस्ट आणि हाय बीम असिस्ट फंक्शन मिळेल. या कारच्या कॅबिनमध्ये एक्सक्लुझिव्ह ग्रे कलर फिनिश आहे आणि कोरिया मॉडेलमध्ये हाय-एंड सेफ्टी त्याचबरोबर सिक्योरिटी फिचर देण्यात आले आहेत. ज्यामध्ये फॉर्वर्ड कोलिजन प्रिवेंशन असिस्टेंस सिस्टम आणि रियर पॅसेंजर नोटिफिकेशनचा समावेशा करण्यात आला आहे.

ही कार येत्या 27 एप्रिल 2021मध्ये लाँच होऊ शकते. तसेच एसयूव्ही पॅनारोमिक सनरूफसह येईल. त्यामध्ये 1.53 पेट्रोल इंजिनव्दारे 113bph, 1.58 लीटर डिझेल इंजिनव्दारे 138bph ची उर्जा उत्पादन करते. यात 1.4 लीटरचे टर्बो- पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 138bph शक्ती उत्पन्न करते. याला स्टँडर्ड व्हेरिंएंटमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळल, इतर इंजिनसह ऑटोमॅटिक ऑप्शन देण्यात येणार आहे.


महत्वाच्या बातम्या-

आता ‘या’ पद्धतीने बदलता येणार फाटक्या नोटा, वाचा…

मोठ्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा चढले; वाचा आजचे…

सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणाऱ्या ‘या’ गाडीची…

कोल्हापुरात भर रस्त्यात राडा! नगराध्यक्षांनीच ग्रामस्थाच्या…

काय बोलावं आता! टीव्हीवर लाईव्ह असतानाच कुत्र्यानं तिच्या…

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy