Russia-Ukraine War | युद्ध आणखी भडकणार?, ‘या’ देशाची युक्रेनला मोठी मदत

नवी दिल्ली | रशिया -युक्रेन (Russia-Ukrain) युद्धाला 20 दिवस झाले तरी जागतिक महाशक्ती म्हणवणाऱ्या राष्ट्रांना देखील युद्ध थांबवण्यात अपयश आलं आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियन सैन्य मोठ्या प्रमाणात युक्रेनवर हल्ले करत आहे. युक्रेनचे सैनिक देखील जिद्दीनं लढत आहेत.

बलाढ्य रशियन सैन्याशी लढण्यासाठी युक्रेनच्या सैनिकांना अत्याधुनिक शस्त्रांची गरज भासत असल्यानं अनेक देश युक्रेनच्या मदतीला पुढं आले आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी युक्रेनला मोठी मदत जाहीर केली आहे. रशियन सैन्याशी लढण्याकरिता तब्बल 6 हजार मिसाईल युक्रेनला देणार असल्याचं, जाॅन्सन म्हणाले आहेत.

बोरिस जाॅन्सन यांनी शस्त्रास्त्रांसोबतच युक्रेनला नुकसान  भरपाई करण्यासाठी 33 दशलक्ष डाॅलर्सची मदत जाहीर केली आहे. परिणामी युक्रेनला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सध्या रशियन सैन्य मोठ्या प्रमाणात युक्रेनवर हल्ले करत आहे. रशियाच्या तिन्ही सेनादलांनी युक्रेनवर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे.

ब्रिटननं सुरूवातीलाच युक्रेनला 4 हजारपेक्षा अधिक अत्याधुनिक शस्त्रे दिली होती. त्यानंतर आता आणखीन मदत केली आहे. इतर राष्ट्रांना देखील जाॅन्सन यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, जागतिक स्तरावर रशियावर अनेक निर्बंध लादल्यानंतरही पुतिन मागं हटायला तयार नाहीत. परिणामी युद्धाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

  देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…

  “दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”

  पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…

करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ!