“हा देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे”

पुणे | देशात कधी कोणत्या क्षेत्रातील व्यक्ती देश आणि धर्मावर मतं व्यक्त करून देशात खळबळ माजवेल सांगता येत नाही. ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी आता धर्मावर केलेल्या वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

विक्रम गोखले यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसानिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलताना गोखले यांनी अनेक विषयांवर आपली मतं व्यक्त केली आहेत.

आपल्या देशाचा इतिहास बाबरपासून सुरू होत असल्याचं सांगितलं जातं. बाबरपासूनच आपला इतिहास लिहीला आणि सांगितला जातो, का त्यांच्या अगोदर कोणी नव्हते का?, असा सवाल गोखले यांनी उपस्थित केला आहे.

हा देश कधीही हिरवा होणार नाही. हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्य गोखले यांनी केलं आहे. गोखले यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

लाल बहादूर शास्त्री यांना सोडून मी इतर सर्व पंतप्रधानांना 100 च्या खाली गुण देतो. लाल बहादूर शास्त्री यांच्या देशासाठीच्या योगदानाला विसरता येत नाही.

शास्त्रीजींची जयंती 2 ऑक्टोबरला येते. मात्र ती हेतुपुरस्पर पुसण्याचं काम केलं गेलं आहे. हे किती वर्ष चालणार आहे?, असं म्हणतानाच गोखले यांनी या देशाला भगवा ठेवण्याची गरज यावेळी व्यक्त केली आहे.

विक्रम गोखले यांनी देशासह राज्यातील विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट मतं मांडली आहेत. विक्रम गोखले यांच्या काही वक्तव्यामुळं राज्यात सध्या प्रचंड चर्चा चालू आहे.

गेल्या सत्तर वर्षातील न झालेली कामे चालू आहेत परिणामी मोदी सरकारला थोडा वेळ तर लागणारच आहे, असंही विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांच्या निधनानंतर महाराष्ट्र विखुरला आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी भाजप आणि शिवसेनेनं एकत्र यावं, असं आवाहन गोखले यांनी भाजप-शिवसेनेला केलं आहे.

दरम्यान, सध्या देशात गाजत असलेल्या कंगणा रनौत प्रकरणावर भाष्य करताना गोखले यांनी कंगणाला समर्थन केल्यानं गोखले वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या  

 “कंगणा जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचं”

“खरंच हिंदू खतरे में है तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा” 

“…तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का?” 

“गाईचं शेण अन् गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते आणि …” 

मोठी बातमी! मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना आलेल्या निनावी फोनमुळे खळबळ, दिली ही धमकी