काय सांगता! ‘हा’ कावळा चक्क बोलतो, पाहा तर मग नेमकं काय म्हणतोय गजब कावळा?

मुंबई | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करुन जातात. तर काही व्हिडीओ आपल्याला चांगली शिकवण देऊन जातात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडीओ देखील आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये बोलणारा कोंबडा असेल किंवा कॅट वॉक करणारी गाई असेल. हे व्हिडीओ आपलं चांगलंच मनोरंजन करून जातात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक बोलणाऱ्या कावळ्याच्या व्हिडीओ खूप वेगानं व्हायरल होत आहे. हा कावळा चक्क माणसाप्रमाणे हॅलो बोलताना दिसत आहे. कावळ्याचं हे बोलणं ऐकून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून नक्कीच हैराण व्हाल.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका मुलीच्या हातावर कावळा बसलेला आहे. या मुलीच्या दुसऱ्या हातात कावळ्यासाठी दाणे आहेत. ही नुलगी कावळ्याशी संवाद साधत त्याला दाणे चारत आहे.

मुलगी या कावळ्याला हॅलो बोलते तर कावळा देखील तिला पुन्हा हॅलो बोलतो. मुलीने कावळ्याला हाय केल्यावर कावळा देखील हाय करतो. एवढंच नव्हे तर ही मुलगी ज्यावेळी शिंकण्याचा आवाज काढते त्यावेळी कावळा देखील शिंकण्याचा आवाज काढतो.

आजवर अनेक कावळे आपण पाहिले आहेत. सर्व कावळे फक्त ‘काऊ काऊ’ असाच आवाज काढताना आपण आजवर पाहिले आहे. मात्र, या व्हिडीओतील कावळा चक्क हाय हॅलो करत असल्याने या व्हिडीओवर विश्वास न बसण्यासारखं आहे.

इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. सुशांत नंदा यांनीच हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओवर सुशांत नंदा यांनी एक मजेशीर कॅप्शन देखील दिला आहे.

हाय, हॅलो, सामान्य कावळा, इतर कॉर्व्हिड्सप्रमाणेच कावळा देखील मानवी भाषेच्या त्यांच्या आवाजात नक्कल करू शकतो, असं कॅप्शन सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे. सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर खूप वेगानं व्हायरल होत आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत 2 हजारापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 200 पेक्षा अधिकार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तसेच अनेक लोक या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

अन् नेहा कक्करचं गाणं ऐकून अनु मलिकनं घेतलं स्वतःला मारुन, पाहा व्हायरल व्हिडीओ

वाह रे मजणू! प्रियकर तब्बल 12 तास पाण्याच्या टाकीवर चढून…

जगन्नाथाच्या ‘या’ मंदिराचं कोडं आजवर वैज्ञानिकांना देखील उलगडलं नाही; वाचा सविस्तर

धक्कादायक! दिल्लीत भररस्त्यात पतीने पत्नीला चाकूने भोसकलं; व्हिडीओ व्हायरल

‘हे काय वागणं आहे सिद्धार्थ?’ लग्नाच्या दोन महिन्यात मिताली-सिद्धार्थचं झालं भांडण?, वाचा नेमकं काय झालं