‘हे’ औषध कोरोनाच्या उपचारासाठी आहे अत्यंत प्रभावी’; पुण्याच्या डॉक्टरांनी केलाय दावा!

पुणे | कोरोनामुळे सध्या सगळीकडे भीतीचं वातावर आहे. मध्यंतरी कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवससेंदिवस वाढतच चालला होता. त्यामुळे सर्वांना कोरोनाची भीती बसली होती. मात्र आता कोरोनाचे पेशंट जेव्हा बरे होऊन घरी आले तेव्हा कोरोनाची भीती कुठेतरी नागरिकांच्या मनातून कमी होताना दिसली.

सध्या अजूनही कोरोनावरची लस बाजारात आली नाही मात्र रशिया हा पहिला देश ठरला आहे की त्यांनी कोरोनावरची लस बाजारात आणली. सर्व देशाचे शास्त्रज्ञ हे युद्ध पातळीवर कोरोनाची लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अशातच आपल्या राज्यातील विद्यचे माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुणे येथील डॉक्टरांनी एक दावा केला आहे की आपल्याकडे एक असं औषध आहे की ते कोरोना उपचारादरम्यान प्रभावी ठरणार आहे.

हे औषध म्हणजे आपल्या शरीरातील रक्त पातळ करण्यासाठी वापरलं जातं. डॉक्टरांनी मॉलिक्यूलर वेट हेपरिन नावाचं इंजेक्शन असून कोरोना रूग्णांचा रूग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. त्यासोबतत हे औषध कोरानाग्रस्त रूग्णांवर उपचारादरम्यान प्रभावी ठरलं असून अनेक कोरोनाग्रस्त या औषधाने कवर झाले असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

SARS- CoV2  या विषाणूमुळे आपल्या शरीरात ब्लड इंफ्लेमेशन आणि ब्लड क्लॉटिंगची समस्या निर्माण होते. त्यावेळे हे रक्त पातळ करण्याचं औषध वापरलं जातं.

इटलीच्या एका कोरोनाग्रस्ताच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं होतं की, कोरोनाग्रस्ताच्या शरीरात रक्त गोठतं म्हणजेच ब्लड इंफ्लेमेशन आणि ब्लड क्लॉटिंगची झालेलं होतं. त्यानंतर रूग्णांची संख्या वाढतच चालल्याने डॉक्टरांनी हे औषध वापरण्यावर भर दिला आहे आणि त्याचा परिणामही काही प्रमाणात डॉक्टरांना दिसून आला आहे. यासंदर्भात नवभारत टाइम्समध्ये डॉ. सुभल दिक्षीत यांनी दावा केला असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, फुफ्फुसात ब्लड क्लॉटिंग झाल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो. याशिवाय हार्ट आणि किडणीमध्ये ब्लड क्लॉटिंगमुळे ब्रेन स्टोक्स आणि किडणीचीही समस्या दूर होऊ शकते, त्यामुळे यावर मॉलिक्यूलर वेट हेपरिन हे परिणामकारक दिसून आलं असल्याचं डॉ. सुलभा दिक्षीत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सत्यजित तांबेंनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काकूंची तुलना केली थेट अर्थमंत्र्यांशी!

राष्ट्रवादीच्या आणखी एका युवा तडफदार आमदाराला कोरोनाची लागण

“महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेबरोबर सत्तेत आहे याची खदखद काही कॉंग्रेसजणांच्या मनात आहे”

‘…त्यावेळी महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले’; तुकाराम मुंढेंनी केला खळबळजनक खुलासा

धक्कादायक! “सुशांतचा पाय मोडलेल्या अवस्थेत होता आणि त्याच्या गळ्यासह ‘या’ भागावर सुयांनी टोचलेलं होतं”