मुंबई | आपण नेहमीच भविष्याचा वि़चार करतो. यासाठी अनेकवेळा पैशांची गुंतवणूक हा पर्याय सर्वात उत्तम समजला जातो. आपण अनेक ठिकाणी आपल्या पैशांची गुंतवणूक करतो. गुंतवणूक ही कायम फायद्याची ठरते कारण आर्थिक अडचणीमध्ये हे पैसे आपणास उपयोगी ठरतात. प्रत्येक ठिकाणीे गुंतवणूकीवर वेगवेगळे फायदे असतात.
पोस्ट ऑफिस हा सुद्धा गुंतवणूकीसाठी एक उत्कृष्ठ पर्याय आहे. पोस्ट आँफिसच्या अनेक फायदेशीर योजना आहेत. ज्यामुळे ग्राहकांना चांगले उत्पन्न मिळते. पोस्ट ऑफिसची अशीच एक धमाकेदार य़ोजऩा आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक फायदा ठरु शकतो.
या योजने अंतर्गत ग्राहकांना 6.6 टक्के वार्षिक उत्पन्न दिले जाणार असून या योजनेसाठी एकरकमी रक्कम भरावी लागणार आहे. यानुसार ग्राहकांना मासिक व्याज उत्पन्न दिले जाणार आहे. या योजनेसाठी वैयक्तिक साडेचार लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. तर जाॉईंट खात्यासाठी 9 लाखांपर्यंत गुतंवणूक करता येते.
‘पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न यो़जना’ असे या योजनेचे नाव आहे. दरम्यान या योजनेसाठी 5 वर्षाचा लॉक-ईन कालावधी दिला आहे. ही पॉलिसी मॅचुअर झाल्यावर याचे पुर्ण पैसे मिऴतील. अल्पवय़ीन व्यक्तीसुध्दा या योजनेचा लाभ घेेऊ शकतात. यासाठी 1 हजार रुपयांपासून पुढे गुंतवणुक करता येेते.
या योजनेअंतर्गत एक लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर वर्षाला 6600 रुपये मिऴणार असुन दरमहा 550 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच संपुर्ण पाच वर्ष प्रत्येक महिन्याला ही रक्कम मिळत जाणार. यामुळे ग्राहकांसाठी ही फायद्याची बाब आहे.
दरम्यान, 2 लाखांच्या गुंतवणूकीस 1100 रूपये मिळणार असून 13200 रुपये वर्षाला मिऴणार आहेत. पुर्ण पाच वर्षात 66000 रुपये रक्कम मिळणार आहे. जेवढी जास्त गुंतवणूक तेवढा जास्त फायदा हा ग्राहकांना होणार आहे.
3 लाख रूपयांच्या गुंतवणूकीवर 1650 रुपये दरमहा मिळतील तर 4 लाखांच्या गुंतवणूकीवर 2200 रुपये मिऴणार आहेत. तसेच साडेचार लाखांच्या गुंतवणूकीवर 2475 रुपये दरमहा मिळतील. गुंतवणुकदार जेवढे जास्त पैश्यांची गुंतवणूक करतील तेवढा जास्त फायदा या योजनेद्वारे मिळणार आहे.
या योजनेद्वारे एकुण पाच वर्षात 1 लाख 48 हजार 500 रूपये मिळतील. या योजनेमधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे जर गुंतवणूकदाराने एक वर्षानंतर व तीन वर्षाच्या आत जर गुंतवणुक मागे घेतली तर दोन टक्के ईतकी कपात केली जाईल. तसेच तीन वर्षानंतर व पाच वर्षाच्या आत खाते बंद केले तर एक टक्के इतकी कपात केली जाईल.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
बाबो! सोन्या-चांदीच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ
अबब…दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले!
जाणून घ्या आजचे राशीभविष्य; ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे खूपच उत्तम दिवस
कचरावेचक भावांच्या ‘या’ कलेवर आनंद महिंद्रा फिदा, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…