‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला आणि वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजप प्रचंड जोमाने कामाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आलेला पहायला मिळत आहे. यातच पश्चिम बंगालमधील एका अभिनेत्रीनं भाजपमध्ये प्रवेश केलेला पहायला मिळाला.

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकारने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. क्रिकेट विश्वापासून तर कलाविश्वातील अनेकांना पक्षात सामावून घेण्यात भाजपला यश आलं आहे.

भाजप प्रवेशाच्या कार्यकम्राचे कोलकात्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पायल सरकार या बंगाली अभिनेत्रीने भाजपचे कमळ हाती घेतले. पश्चिम बंगालमधील काही मुख्य अभिनेत्रींपैकी एक पायल असल्यामुळे तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असलेला पहायला मिळत आहे.

दरम्यान, अभिनेत्री पायल सरकार सोशल मीडियावर बरीच सक्रिय असलेली पहायला मिळते. ती तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. पायलने आपल्या करिअरची सुरुवात आधी मॉडेलिंगपासून सुरु केलं. त्यानंतर तिला बंगाली चित्रपटांची संधी मिळाली.

अभिनेत्री पायल सरकारने बॉलिवूडमध्ये देखील भूमिका साकारली आहे. अभिनेता कुणाल खेमूच्या गुड्डू की गन या सिनेमात दिसली होती. तिने नुकतंच ‘मिर्च 3’ आणि ‘हेचही’ या चित्रपटांमध्ये काम केलं.

पायल सरकारनं 2006 साली ‘बिबर’ या चित्रपटातून बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Paayel Sarkar (@paayelsarkar)

महत्वाच्या बातम्या –

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय – देवेंद्र फडणवीस

‘शिव्या खायला तयार राहावं लागणार’, ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

जाणून घ्या कढीपत्ता खाण्याचे ‘हे’ फायदे

…तर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील; मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy