‘या’ चित्रपट दिग्दर्शकाच्या पत्नि आणि मुलीची आत्महत्या; घरातच घेतलं स्वतःला जाळून

मुंबई|  सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. यातच कोरोनाच्या विळख्यात अनेक बाॅलिवूड कलाकारही सापडताना दिसत आहे.

एकीकडे कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असताना दूसरीकडे बाॅलिवूडमधून आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं दिसून येतय. अशातच बाॅलिवूडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

एका चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीने मुंबईच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संतोष गुप्ता हिंदी चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक संतोष गुप्ता यांची पत्नी आणि मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 55 वर्षीय अस्मिता गुप्ता आणि 16 वर्षीय सृष्टी गुप्ता या दोघींनी राहत्या घरी स्वत:ला घेत आत्महत्या केली आहे. सोमवारी ही घटना घडली होती. मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील डीएन नगर या भागात राहत होत्या.

संतोष गुप्ता यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी अंधेरी येथील डी.एन. नगर परिसरातील त्यांच्या घरी सोमवारी दुपारी आत्महत्या केली. घरातून आगीचे लोळ येत असल्याने शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला कळवले. अग्निशामकचे जवान येताच त्यांनी दोघींना बाहेर काढले आणि त्यांना कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना रुग्णालयात दाखल करताच अस्मिता यांचे निधन झाले तर सृष्टी 70 टक्के भाजलेली असलेल्याने ऐरोली नॅशनल बर्नमध्ये तिला उपचारासाठी पाठवण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचे मंगळवारी निधन झाले.

अस्मिता बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या दुर्धर आजाराने त्रस्त होत्या. आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं आहे. आईची ही अवस्था पाहून मुलगी सृष्टीनेसुद्धा आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, डी.एन.नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले की, दोन वेगवेगळ्या अपघाती मृत्यूचे गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

संतोष गुप्ता यांना कमी बजेट चित्रपटांसाठी ओळखलं जातं. त्यांनी 2011 मध्ये ‘फरार या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याचबरोबर संतोष यांनी ‘रोमी द हिरो’ ‘आज की औरत’ या चित्रपटांची सुद्धा निर्मिती केली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

इंधन कंपन्यांच्या ‘या’ मोठ्या निर्णयाने…

‘हा’ तरुण केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेला अन् खुर्चीवर बसताच रडू लागला; पाहा मजेशीर व्हिडीओ

ऐन लग्नसराईच्या काळात सोनं 50 हजारापार जाण्याची शक्यता, वाचा आजचा दर

अरे वाह! या’ स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कुटर विषयी तुम्हाला माहीत आहे का? नक्की वाचा

मध्य प्रदेश पोलिसांची गुं.डागिरी! रिक्षा चालकाला भर चौकात मारला; व्हिडीओ व्हायरल

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy