“मग तो एवढा प्रामाणिक कसा? हे तर मोदींच्या वर झालं”

मुंबई | शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची खैरात केली आहे.

समीर वानखेडेंकडे 70 हजारांच शर्ट, 2 लाखांचे बूट आणि 15 कोटींची संपत्ती आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. वानखेडेंकडे महागडे बूट आहेत लुई वेटॉनच्या बुटांची किंमत दोन-दोन लाख रूपये आहे. त्यांचं शर्टही 50 हजारांपेक्षा अधिक किंमतीचं आहे, असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे.

टी-शर्टची किंमत 30 हजारांपासून सुरू होते. ते जी ट्राऊजर परिधान करतात तर शर्टची किंमत 70 हजार इतकी आहे, असाही दावा मलिक यांनी केला आहे. तसेच ते 25 ते 30 लाखांच घड्याळ वापरतात, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

त्यांची पॅंट लाखाची, पट्टा दोन लाखाचा,घडी 50 लाखाची, बूट अडीच लाखाचे असं म्हणतं  हे तर मोदींच्याही पुढे निघाले. रोज नविन कपडे घालतात. एखादा अधिकारी इतके महागडे कपडे वापरत असेल तर तो प्रामाणिक कसा? अशी शंका नवाब मलिक यांनी उपस्थित केली आहे.

यावेळी नवाब मलिक यांनी दिपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रध्दा कपूर यांच्या एनसीबीकडे प्रलंबित असलेल्या केसचा देखील उल्लेख केला आहे. 2020 मध्ये समीर वानखेडे आल्यानंतर एक केस नोंदवली आहे. त्यावेळी सारा अली खानला बोलंवल होतं. तेव्हा श्रद्धा कपुरलाही बोलवलं होतं. त्यानंतर दिपिका पदुकोणलाही बोलावलं गेलं. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला या केसमध्ये बोलावलं गेलं, असा आरोप नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केला आहे.

ही फिल्म इंडस्ट्रीबाबत सुरू झालेली केस अजुनही बंद झाली नाही. त्यासंदर्भात चार्जशीटही दाखल करण्यात आलेली नाही. 14 महिने होऊन गेले तरीदेखील केस बंद होत नाही. त्या केसमध्ये असे काय आहे? असा प्रश्न नवाब मलिक यांनी केला आहे.

दिपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रध्दा कपूर यांच्या केसमध्ये कोट्यावधी रूपये वसूल करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मालदीवमध्ये ही वसुली करण्यात आली, असाही दावा मलिक यांनी केलायं.

तसेच नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, आम्ही दुबईचे दाेन फोटो पोस्ट केले आहेत. त्यात एक मालदीवचा आहे आणि दुसरा दुबईचा आहे. मी दुबईत गेलेलो नाही. बहीण गेली होती हेही म्हणणं बरोबर नाही. मालदीव दौऱ्यावरून एनसीबीने चौकशी करावी, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

तुम्ही मालदिवला होता. मालदिवचा दौरा सोपा नव्हता. एवढे लोक गेले म्हणजे 20 ते 30 लाखांचा खर्च येताचं.याची एनसीबीच्या व्हजिलन्स टीमने चौकशी करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्याकडे 70 हजार रूपयांचं शर्ट कसं आलं? असा सवाल उपस्थित करत अनेक अधिकारी टीव्हीवर येतात परंतु, त्यांचं शर्ट हजार पाचशेचं असतं खुप महागडं नसत, असं नवाब मलिक म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

पुढील 3,4 दिवसांत कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी, दिवाळीही निघणार तुरुंगात

  “अनिल देशमुख यांना फसवलं गेलंय”

  शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला- उद्धव ठाकरे

“ठाकरे सरकारच्या मदतीनंच परमबीर सिंग गायब”