तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज विदेशी कंपनी 1 हजार जणांना नोकरी देणार!

नवी दिल्ली | कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. एका अहवालानुसार कोरोनाच्या दोन्ही लाटेत आतापर्यंत 11 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याचं समोर आलं होतं. कोरोना काळात अनेक उद्योगंधंदे बंद पडल्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. मात्र आता तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग पुढील वर्षी भारतातील तब्बल 1 हजार इंजिनियरची भरती करणार आहे. हे सर्व इंजिनिअर आयआयटी आणि इतर प्रमुख इंजनियरिंग संस्थांमधून नियुक्त करण्यात येणार आहेत

पुढच्या वर्षी कंपनीमध्ये एक हजार अभियंत्यांना संधी देण्यात येणार असून त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, डेटा मॅनेजमेंट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. याबाबत  कंपनीने माहिती दिली आहे.

तरुणांना अधिकाधिक संधी देऊन, त्यांच्या कल्पनांचा कंपनीसाठी उपयोग करण्याचे उद्दिष्ट सॅमसंगने ठेवलं आहे, असं सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष समीर वधावन यांनी म्हटलं आहे.

येणाऱ्या काळात कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची भरती होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीकडून पुढील वर्षी एक हजार अभियंत्यांना संधी देण्यात येईल.

अभियंत्यांमध्ये इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, डाटा मॅनेजमेंट आणि स्वफ्टवेअर क्षेत्रातील अभियंत्याचा समावेश असणार आहे. तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी चांगले वेतने देखील देण्यात येईल, असं कंपनीने सांगितलं आहे.

आम्हाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात केवळ हजार अभियंत्यांनाच नाहीतर आणखी हजारांना संधी दिली जाऊ शकते. हे सर्व अभियंते आयआयटी कानपूर दिल्ली अशा संस्थामधून भरण्यात येतील, असं कपनीने म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय” 

‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी येण्याची दाट शक्यता- राजेश टोपे 

एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ; अनिल परबांची मोठी घोषणा 

एकनाथ शिंदे की अजित पवार?, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार??? 

नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला झटका, केली ‘ही’ मोठी घोषणा