नवी दिल्ली | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा डीए म्हणजे महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम मिळणार नसल्याचं कळतंय.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये मार्च महिन्यात वाढ होणार आणि 18 महिन्यांपासून थकीत असलेली रक्कम होळीच्या सणाला मिळणार अशी माहिती होती. पण 18 महिन्यांची डीएची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.
जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतची डीएची थकबाकी आहे. सरकारने याबाबतचे निवेदन जारी केलं आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली होती. कोरोना महामारीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थांबवला होता. या पैशातून गरीब आणि गरजवंतांना सरकार मदत करू शकेल, या उद्देशाने महागाई भत्ता दिला नसल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं.
कोरोना महामारीमुळे सरकारने मंत्री आणि खासदारांच्या पगारात कपात केली होती. परंतु, गेल्या वर्षभरापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात केली नव्हती. याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या डीएमध्येही कपात झाली नव्हती.
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात यावेळी तीन टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे 31 टक्के मिळणारा महागाई भत्ता यापुढे वाढून तो 34 टक्के मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी भाऊ वाटतो, कारण…”
“सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे”
मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र, दिल्या ‘या’ सूचना
‘चौकशी होणार कळल्यामुळे संजय राऊत सैरभैर झालेत, त्यांना आवरा’
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अन् भाजपला शिवसेनेचा जोर का झटका!