करुणा शर्मा यांच्या घोषणेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, “हे तर मोठं आश्चर्यच, कोल्हापूरमधून…”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनी राजकारणात उडी मारली आहे. आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं होतं.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. दरम्यान ही पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. कारण करुणा शर्मा यांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे.

करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांनी आता कोल्हापूरातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा होताना दिसत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. करुणा शर्मा या कोल्हापूर उत्तरमधून लढणार आहेत, हे मोठे आश्चर्य आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

करुणा शर्मा तर परळीमधून लढणार होत्या. पण, कोल्हापूरमधून निवडणूक लढणार आहेत, हे मात्र मला माहिती नाही, असंही पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणं, गोरगरीबांवरील अन्याय दूर करणं या उद्देशाने या पक्षाची स्थापना केल्याचं देखील करूणा शर्मा यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“नवरा मला त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवायला लावतो, मी तर…”

उन्हाळा वाढतोय काळजी घ्या! येत्या 48 तासात राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

 “महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात”, भाजपच्या दाव्यानं राज्यात खळबळ

 बंपर ऑफर! होळीनिमित्त Hondaच्या गाड्यांवर मिळणार तब्बल 25 हजारांचा डिस्काऊंट

 ‘संपूर्ण जगात याची चर्चा होणार’; करूणा शर्मा यांची मोठी घोषणा