भाऊ शौविककडून ‘ही’ चूक झाली अन् रिया एनसीबीच्या जाळ्यात अडकली

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा सबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला ताब्यात घेतलं आहे. तसेच रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर काही जणांनाही याप्रकरणी अ.टक करण्यात आली आहे.

रियाला अ.टक करण्यापूर्वी एनसीबी सलग तीन दिवस रियाची चौकशी करत होती. आपला ड्र.ग्जशी काहीही संबंध नाही, असं रिया  चौकशी दरम्यान वारंवार सांगत होती. मात्र, एनसीबीकडे रिया विरुद्ध ठोस पुरावे होते. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीनं केलेल्या एका चुकीमुळे एनसीबीचा रियावरील संशय अधिक वाढला होता.

सुशांत प्रकरणी अं.मली पदार्थांचा तपास करताना एनसीबीनं रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या बँक डिटेल्सची छाननी केली होती. यावेळी एनसीबीला रियाच्या खात्यावरून एक मोठा बँक व्यवहार झाल्याचं लक्षात आलं होतं. रियाच्या खात्यावरून एका ड्र.ग्ज डिलरला पैसे पाठवण्यात आले होते. हे पैसे शौविकनं पाठवले होते.

काही दिवसांपूर्वी शौविकच्या सांगण्यावरून सॅम्युअल मिरांडा एका ड्र.ग डिलरकडे बड म्हणजेच गां.जा आणण्यासाठी गेला होता. मात्र, गां.जा आणायला जाताना सॅम्युअल पैसे घेऊन जाणं विसरला होता. डिलरपाशी पोहचल्यावर सॅम्युअलनं शौविकला पैसे पाठवण्यास सांगितलं. यावेळी शौविकनं रियाच्या खात्यावरून ड्र.ग्ज डिलरला पैसे पाठवले होते.

रियाच्या खात्यावरून ड्र.ग्जचा झालेला हा व्यवहार एनसीबीच्या लक्षात आला आणि मग एनसीबीचा रियावरील संशय अधिक दृढ झाला. यानंतर एनसीबीनं रियावरील चौकशीचा फास आणखी आवळला. रियाच्या चौकशीच्या शेवटच्या दिवशी रियानं एनसीबीला आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान, सॅम्युअल मिरांडाकडे घरखर्चासाठी सर्वात जास्त पैसे असायचे. सॅम्युअलच्या पैशांतून सॅम्युअल मार्फत ड्र.ग्ज खरेदी केले जात होते. रियाच्या मोबाईल मधील अनेक चॅट्समध्ये देखील या गोष्टीचा उल्लेख आढळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रिया चक्रवर्तीला फसवलं जात आहे – स्वरा भास्कर

रात्र झाली की तो दिग्दर्शक… अभिनेत्री स्वरा भास्करनं सांगितला धक्कादायक अनुभव

‘पीके’ सिनेमातील डिलीट केलेला सीन व्हायरल; सुशांतचे चाहते आमीर खानवर संतापले!

रिया चक्रवर्तीनं दिलेला ‘तो’ इशारा ठरला खरा; केला मोठ्या नावांचा खुलासा

सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर न्यायालयाची मोठी सुनावणी