नवी दिल्ली | हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (HDFC) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेड बैठकीत हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेड हे एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) विलीन होणार आहे.
एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने या विलीनीकरणाला मंजुरी दिली असल्याचं कंपनीनं शेअर बाजाराला कळवलं आहे.
या घोषणेनंतर आज सोमवारी शेअर बाजारात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोन्ही कपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली.
एचडीएफसी ही दोन उपकंपन्यांना एचडीएफसी बँकेत विलीन करणार आहे. यातून एचडीएफसीचा एचडीएफसी बँकेत 41 टक्के हिस्सा होईल. आर्थिक 2024 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.
विलीनीकरणाच्या प्रस्तावाला नुकताच एचडीएफसीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. हे विलीनीकरण दोन्ही बरोबरीच्या कंपन्यांचं एकत्रीकरण असल्याचं मत एचडीएफसी अध्यक्ष दिपक पारेख यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, एचडीएफसी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी आहे. ज्याची एकूण मालमत्ता 5.26 लाख कोटी आहे. तर मार्केट कॅप 4.44 लाख कोटी आहे.
एचडीएफसी बँक 8.35 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. एचडीएफसी लिमिटेडच्या निर्णया झाल्याने आता एचडीएफसी लिमिटेडच्या सहाय्यक कंपन्या आणि सहयोगी एचडीएफसी बँकेत विलीन होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात मोठी बातमी! HDFC ने केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा
जिओचा धमाका प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत फ्री कॉलिंग आणि बरंच काही…
“गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांना संधी मिळाली होती पण…”
युक्रेनमधून भयंकर बातमी समोर, युक्रेनच्या मंत्र्याचा अत्यंत धक्कादायक दावा
पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना; आज ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल महागलं