यंदाच्या पावसाळ्याविषयी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

मुंबई | गतवर्षी पावसाने राज्यासह देशभर जोरदार हजेरी लावली होती. मान्सूनच्या सुरूवातीला पावसाने म्हणावी अशी कामगिरी केली नव्हती. जूनपासून सुरू झालेला पावसाळा सरते शेवटी नुकसान करून गेला.

देशातील अनेक राज्यात गतवर्षी पावसानं मोठं नुकसान केलं. तर राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतीमाल वाया गेल्याचं दिसून आलं.

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

वातावरणातील बदलांमुळे अवकाळी पावसाची हजेरी कायम पहायला मिळाली. प्रत्येक सीझनला अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळाली. अशातच आता यंदाच्या पावसाळ्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

यंदाच्या वर्षी पाऊसमान चांगलं राहणार असल्याचा अंदाज ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं यावर्षी वर्तवला आहे.  जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही पावसाळी महिन्यात चांगाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

यंदा पावसाळ्याला चांगल्या मान्सूनपूर्व पावसाची साथ मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे.

भारतीय विभागाकडून अद्याप हवामानाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. एप्रिलपर्यंत अंदाज वर्तवणात येईल, असा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…

करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ! 

“माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता” 

अजित पवारांनी सभागृहात उडवली प्रविण दरेकरांची खिल्ली, म्हणाले… 

मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; शूटिंग संपवून घरी येताच ‘या’ अभिनेत्याचा मृत्यू