“…हे असलं काही चालणार नाही”; सुशीलकुमार शिंदेंनी राज ठाकरेंना फटकारलं

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या सभेत हिंदूत्वाची भूमिका मांडली आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. राज ठाकरे यांनी या सभेत मशिदींच्या भोंग्याविरूद्ध आवाज उठवत थेट भूमिका घेतली.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसने टीका करण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांची उत्तर सभा आज होणार आहे. त्याआधी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सुशीलकुमार शिंदे यांनी सध्याच्या राजकारणावर टीका करत राज ठाकरे यांना त्यांच्या भूमिकेवरून फटकारलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

कोणीही जातीयतेचा प्रश्न घेऊन हाताळत असेल तर या देशाच्या दृष्टीने ते योग्य नाही. जाती-धर्माचे राजकारण या देशामध्ये चालत नाही, त्यामुळे या असल्या गोष्टी आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जातीवरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून देखील सुशीलकुमार शिंदे यांनी तोफ डागली आहे.

एका जातीला दोष देण्याचा काही कारण नाही. ब्राह्मण, दलित, मराठा कोणीही असो सर्वांनी सर्वधर्मसमभावाची पूजा केली पाहिजे, अशं शिंदे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत?”

शरद पवारांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले… 

“कायद्यापासून पळू नका सांगणारे आता *** पाय लावून पळतायेत” 

Raj Thackeray | “जरा मोकळं बोलले तर इतकी हवा, मनमोकळं बोलले तर मग एकदम धुव्वा” 

राज ठाकरेंच्या सभेला काही तास शिल्लक असताना संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट, म्हणाले…