मुंबई | आयपीएलमधील (IPL 2022) दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल हंगामातील 30 वा सामना खेळला गेला. रंगदार झालेल्या या सामन्यात अखेरच्या चेंडूवर चेन्नईच्या थालाने दमदार चौकार खेचत सामना जिंकून दिला.
चालू हंगामात मुंबईचा हा सलग 7 वा पराभव आहे. त्यामुळे आता मुंबईच्या प्लेऑफच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे चेन्नईचा देखील हा दुसरा विजय असल्याने चेन्नईला मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. अशातच धोनी व्यकतिरिक्त कालचा सामना दोन वेस्ट इंडिज खेळाडूंमुळे चर्चेत होता.
नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतलेला कायरन पोलार्ड आणि वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो यांच्या दोस्तीचे किस्से अनेकदा ऐकले असतील. अनेकदा लाईव्ह सामन्यात दोघं भांडताना देखील दिसतात.
अशातच काल गुरुवारच्या सामन्यापूर्वी दोन्ही खेळाडूंची भेट झाली, त्यावेळी ड्वेन ब्राव्हो कायरन पोलार्डच्या पायाला स्पर्श करताना दिसला. भारतीय संस्कृतीनुसार ब्राव्हो पोलार्डच्या पाया पडला. पोलार्डच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच या दोघांची भेट झाली होती.
सामना सुरू असताना पोलार्ड फलंदाजीसाठी आला त्यावेळी ब्राव्हो गोलंदाजी करत होता. त्यावेळी एका हार्ड लेंथ चेंडूवर पोलार्डने बचावात्म फटका मारला. त्यावेळी धाव घेताना ब्राव्हो मध्ये आला. त्यावेळी भांडणं करण्याऐवजी पोलार्डने त्याच्या डोक्याचं चुंबन घेतलं.
दरम्यान, वेस्ट इंडिजकडून खेळणारे हे सख्खे मित्र कधी मैदानावर आदळआपट करताना दिसतात. आयपीएलचे अनेक व्हिडीओ व्हायरल देखील झाले आहेत. मित्राच्या निवृत्तीचं सेलिब्रेशन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
पाहा व्हिडीओ-
Pollard kisses Bravo 😍🤣😱 pic.twitter.com/OPW8qpW1QJ
— Big Cric Fan (@cric_big_fan) April 21, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
“पोलिसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवावी”
“अमोल मिटकरी म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालेलं लेकरू”
मोठी बातमी! राणा दाम्पत्यांना पोलिसांकडून नोटीस जारी
“भाजपला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार लागतात”
“बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर पोहोचू द्या, हे लोक…”