सर जडेजाने केला ‘हा’ खास विक्रम; ठरला जगातला पहिलाच डावखुरा फिरकीपटू

विशाखापट्टणम : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 8 बाद 385 धावा केल्या आहेत. या डावात भारताकडून फिरकीपटू रवींद्र जडेजाने 1 विकेट घेत टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 200 विकेटचा टप्पा गाठणारा डावखुरा बॉलर ठरला आहे.

रवींद्र जडेजाने 44 टेस्ट मॅचमध्येच 200 विकेट घेतल्या आहेत. तर श्रीलंकेच्या रंगना हेराथला 200 विकेट घ्यायला 47टेस्टची गरज लागली. मिचेल जॉनसने 49 टेस्टमध्ये, मिचेल स्टार्कने 50 टेस्टमध्ये तर बिशनसिंग बेदी आणि वसीम अक्रम यांनी 51 टेस्टमध्ये 200 विकेट घेतल्या.

रवींद्र जडेजाने डीन एल्गारला 160 रनवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं आणि त्याच्या 200 विकेट पूर्ण केल्या. डिन एल्गारबरोबरच क्विंटन डिकॉकनेही त्याचं शतक पूर्ण केलं. डिकॉक 111 रनवर आऊट झाला. तर कर्णधार फॅफ डुप्लेसिसनेही अर्धशतकी खेळी केली. 

रवींद्र जडेजाने 44 टेस्टच्या 83 इनिंगमध्ये 2.43 ची इकोनॉमी आणि 24.22 च्या सरासरीने 200 विकेटचा टप्पा गाठला. जडेजाने 9 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि 1 वेळा 10 विकेट घेतल्या. 

बॅटिंग करताना जडेजाने 33.12 च्या सरासरीने 1,590 रन केले. यामध्ये 1 शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.  

महत्वाच्या बातम्या-