मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केली. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात त्यांना ईडीने रात्री 12 वाजता अटक केली आहे
गेले अनेक दिवस ते फरार होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी साडे दहा-अकराच्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली. अखेर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली.
राष्ट्रवादीला दोन जबरदस्त झटके बसले आहेत. आज सकाळी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिली आहे.
अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून आयटीच्या रडारवर आहेत. गेल्या महिन्यात आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती.
184 कोटींची बेहिशोबी मालमत्त्ता सापडली होती. आयकर विभागाने 7 ऑक्टोबरपासून 70 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती.
अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मालकीच्या अनंत मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरही छापा मारला होता. पवारांच्या बहिणींच्या मालकीच्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली होती.
7 ऑक्टोबर रोजी हे छापे मारण्यात आले होते. या छापेमारीत बेहिशोबी मालमत्ता आणि काळा पैसा जप्त करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
ज्या दिवशी अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी छापेमारी करण्यात आली होती, त्यावेळी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. आपल्या तिन्ही बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या –
“…तर मी फोटोग्राफी केली असती आणि फडणवीसांना प्रदर्शनाला बोलावलं असतं”
पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्राला लुटलं आहे- किरीट सोमय्या
मी सरळमार्गाने आणि नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती- अनिल देशमुख
नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
“देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन हा ड्रग्जचा खेळ सुरु आहे”