सोने-चांदी खरेदी करण्याची हीच आहे वेळ! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव उतरले

नवी दिल्ली | सोन्या चांदीची वा.ढती मागणी पाहता अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्या चांदीचे भा.व देखील गगनाला भिडले आहेत. हौसेबरोबरंच एक उत्तम गुंत.वणूक म्हणून देखील लोक सोन्या-चांदीला पसंती दाखवतात. यामुळे सध्या सोनं त.ब्बल 50 हजार रुपये प्रती तोळ्याच्या आसपास राहत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून सोन्या चांदीच्या भा.वात क्षुल्लक घ.ट पहायला मिळत आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याची किंमत 49 हजार 550 रुपये प्रती तोळा इतकी होती. तर आज या किंमतीत 210 रुपयांची घट होऊन सोनं 49 हजार 340 रुपये प्रती तोळ्यावर आले आहे.

सोन्याबरोबरंच आज चांदीच्या दरात देखील मोठी घ.ट पहायला मिळाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर प्रती किलो चांदीची किंमत 67 हजार 400 रुपये इतकी होती. तर आज या किंमतीत तब्बल 600 रुपयांची घ.ट होऊन चांदी 66 हजार 800 रुपये प्रती किलोवर आली आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

अमेरिकनं भारतीयांसाठी दिली गुडन्यूज; या नियमात मोठा बदल

श्रीलंका क्रिकेटमध्ये से.क्स स्कॅं.डल? वैद्यकीय कर्मचारी महिलेबर खेळाडूने लैं.गिक गै.रवर्तन केल्याच्या आ.रोप

‘तुझी साथ नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील’; भारतीय संघाच्या हुकमी एक्काचं भावनिक ट्वीट

काय सांगता! आता गॅ.स सि.लेंडर मोफत मिळणार; वाचा पेटीएमची भन्नाट ऑफर

पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार? अजित पवार म्हणाले…

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy