पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये घडला असा प्रकार; साऱ्या पुण्यात उडाली खळबळ

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. प्रत्येकच देश कोरोना महामा.रीशी संपूर्ण ताकदीनिशी लढा देत आहेत. भारत देशालाही या महामा.रीचा चांगलाच फटका बसला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. पुण्यात कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता पुण्यातही जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात आलं आहे. मात्र, पुण्यातील या जम्बो कोविड रुग्णालयातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधून 33 वर्षीय कोरोनाबाधित महिला गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जम्बो कोविड रुग्णालयातील या धक्कदायक घटनेमुळे पुणेकर चांगलेच संतापले आहेत. संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी पुणे जम्बो कोविड रुग्णालयाच्या प्रशासना विरोधात गु.न्हा दाखल केला आहे. रुग्णालय प्रशासन मुलीची माहिती देत नाही तोपर्यंत रुग्णालयासमोर आमरण उपो.षण करणार असल्याचं या महिलेची आई रागिणी गमरे यांनी म्हटलं आहे.

संबंधित कोरोनाबाधित महिला एक मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण असल्यामुळं ही महिला आपल्या पती पासून वेगळी राहत होती. येरवड्यातील मनोरुग्णालयात या महिलेवर उपचार चालू होते. मात्र, काही दिवसांपूर्वी या महिलेला कोरोना झाल्याचं निदान झालं होतं यामुळे तिला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ससून रुग्णालयातून त्याच दिवशी तिला जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं.

29 ऑगस्ट रोजी या महिलेला पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं. मुलीचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी 13 सप्टेंबरला संपत असल्यामुळं रागिणी गमरे मुलीची चौकशी करण्यासाठी 12 सप्टेंबरला सेंटरमध्ये गेल्या होत्या. तेव्हा गमरे यांना उद्या येवून तुमची मुलगी घेऊन जा, असं सांगण्यात आलं होतं.

रागिणी गमरे 13 सप्टेंबरला मुलगी आणण्यासाठी पुन्हा जम्बो कोविड सेंटरमध्ये गेल्या मात्र त्यांना त्यावेळी रुग्णालय प्रशासनानं पुन्हा घरी पाठवलं. तुमची मुलगी सापडत नाही. मुलगी सापडल्यावर तुम्हाला कळवू तोपर्यंत तुम्ही घरी जावा, असं रुग्णालय प्रशासनाकडून गमरे यांना सांगण्यात आलं. त्या रात्री रागिणी गमरे आपल्या नातेवाईकांसोबत पुन्हा रुग्णालयात गेल्या तर रुग्णालयानं तुमच्या मुलीला 4 दिवसांपूर्वीच डिस्चार्ज दिला आहे, असं सांगितलं.

रागिणी गमरे यांनी रूग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप देखील मुलीचा शोध लागला नाही. यामुळे जोपर्यंत मुलगी शोधली जात नाही तोपर्यंत रुग्णालयासमोर आम.रण उपो.षण करणार असल्याचं गमरे यांनी सांगितलं आहे.  पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा भोंगळ कारभार उघडकीस आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

क्वारंटाईन सेंटर्समध्ये अजून किती महिलांवर अत्या.चार झाल्यानंतर ठाकरे सरकार नियमावली जाहीर करणार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुर.क्षिततेची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं असं काही; आजारी चाहत्याला बसला सुखद धक्का!

सुशांत प्रकरणात नवा ट्विस्ट; आता रियाच्या वकिलांनी केला ‘हा’ नवा दावा

मोबाईल स्लो झाला असेल तर या 3 ट्रिक वापरा; अगदी नवीन मोबाईलसारखा चालेल!

सक्सेस मिळत गेलं तसतशी श्रद्धा कपूर… जया साहानं केले धक्कादायक खुलासे

“नवाजुद्दीन सिद्दीकीनं माझी फ.सवणूक करून माझ्यावर बला.त्कार केला”