कोरोना लसींवरचे राजकारण थांबवा म्हणत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्यानं केलं ट्विट

मुंबई| सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. देशात अनेक ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊन लावला जात आहे. विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु आहे. महाराष्ट्रातही करोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. परंतु, राज्यात सध्या लसींचा तुटवडा भासत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतंच जाहीर केलं. लसींच्या कमतरतेमुळे काही ठिकाणचं लसीकरण थांबवण्यातही आलं आहे. या प्रकरणी अभिनेता संदीप पाठकने ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता संदीप पाठकने आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, ‘देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना इतर राज्यांना लस पुरवठा मोठ्या प्रमाणात का ? पक्ष, राजकारण ह्यांच्या वादात सामान्य माणूस कोरोनाग्रस्त होतोय. आपण माणसाच्या जीवाशी खेळतोय ह्याचं भान सर्व राजकीय पक्षांनी असु द्यावं’ अशा शब्दांमध्ये त्याने हा प्रश्न राजकारण्यांना आणि सरकारलाही विचारला आहे.

सामान्य माणूस हा कोरोनाने भरडला जात असताना राजकारण आणि पक्ष यांच्या भांडणात जनतेचा जीव जात असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. त्याच्या या ट्विटवर चाहत्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युझर्सला त्याचे म्हणणे पटले असून त्यांनी संदीपला त्यांचा पाठिंबा जाहीर केला आहे.

संदीपचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून संदीपचे मत योग्यच आहे असे नेटिझन्स त्याला सोशल मीडियावरून सांगत आहेत. परखडपणे आवाज उठवल्याबद्दल धन्यवाद… आजकाल काहींना हे देखील जमत नाही…. असे म्हणत एकाने या ट्वीटला रिप्लाय दिला आहे.

यासोबत संदीपने आणखी एक ट्विट करत महाराष्ट्राला लसींची गरज असल्याचे  #MaharashtraNeedsVaccine असा हॅशटॅग वापरुन सांगितले आहे. त्याच्या या ट्विटवर चाहत्यांनी लाईक आणि प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता अधिक असल्याचे पावलोपावली दिसून येत आहे. आता कोरोनाची नवी लक्षणं समोर येत आहेत. सर्दी-खोकला-ताप ही लक्षणं सोडून इतर काही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर सावध राहा.

कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सक्रिय झाल्याने, त्याची नवीन लक्षणे देखील समोर येत आहेत. या नव्या लक्षणांमध्ये काही लक्षणं ही नवीन आहेत. नवीन लक्षणांमध्ये पोटात वेदना, उलट्या होणे, सांधेदुखी, अशक्तपणा येणं, भूक न लागणे असे लक्षणं दिसत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

डोळ्याखाली दुखापत होऊनही विराट खेळत राहिला! पाहा काळजाचा…

IPL 2021: यावर्षीही मुंबईची पहिली मॅच देवाला, रोमांचक…

रुपयात घसरण झाली अन् सोन्याचे दर वधारले, वाचा आजचे दर

चक्क रस्त्यावर रंगली WWE! चिमुरड्यांच्या हाणामरीचा हा व्हिडीओ नक्की बघा, तुम्हीही पोट धरून हसाल

संतापलेल्या द्रविडचा अवतार पाहून विराटही हैराण, गाडीच्या काचा फोडल्या अन्…; पाहा व्हिडीओ