आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘या’ मराठी चित्रपटानं पटकावला पुरस्कार, वाचा सविस्तर

मुंबई| मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल नुकतेच पार पडले. मराठी चित्रपट आता जागतिक स्तरावर उत्तमोत्तम दर्जाच्या कलाकृतींनी आपला ठसा उमटवत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मराठी चित्रपट सन्मानास पात्र ठरत आहेत. अजून एका चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे.

मराठी सिनेमा ‘पुगळ्या’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजवला आहे. मास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2021 मध्ये ‘पुगळ्या’ चित्रपट सर्वोत्तम परदेशी भाषा कॅटेगरीमध्ये अव्वल ठरला आहे.

‘पुगळ्या’ या चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 चा बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला मिळालेल्या या यशामुळे या चित्रपटाची टीम प्रचंड खूश आहे.

‘पुगळ्या’ या मराठी चित्रपटाला मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट लहान मुलांच्या भावविश्वावर आधारलेला असून आत्तापर्यंत या चित्रपटाने आत्तापर्यंत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवले आहेत.

आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 45 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केलं आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या सन्मानाबद्दल माहिती दिली आहे.

डॉ. सुनिल खराडे यांनी एका लघुपटासाठी ‘पुगळ्या’ ही कथा लिहिली होती. पण ही कथा लिहून झाल्यानंतर या कथेवर लघुपट बनवण्याऐवजी एखादा चित्रपट बनवूया. या कथेचा खूपच चांगला चित्रपट होईल असे त्यांना वाटल्याने त्यांनी हा चित्रपट बनवण्याचे ठरवले. हा चित्रपट लहान मुलं आणि कुत्र्यांच्या नात्यावर आधारित आहे.

वृषभ आणि दत्ता अशा दोन मुलांची या चित्रपटात कथा दाखवण्यात आली असून त्यातील वृषभ हा शहरी भागातील तर दत्ता हा ग्रामीण भागातील आहे. या दोघांची एकमेकांशी ओळख नसते. पण त्या दोघांना देखील एक कुत्रा सांभाळण्याची इच्छा असते. वृषभला त्याच्या घरातील मंडळी एक कुत्रा भेट म्हणून देतात. पण हा कुत्रा त्याच्याकडून हरवतो आणि तो दत्ताला मिळतो अशी या चित्रपटाची कथा आहे.

लॉकडाऊनमुळे हा सिनेमा भारतात अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही.

 

महत्वाच्या बातम्या – 

ऐन गुढीपाडव्याच्या सणाला सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा…

‘या’ अभिनेत्रीनं मोराच्या जवळ जाण्याचं धाडस केलं पण चांगलंच अंगलट आलं, पाहा व्हिडीओ

पोलीस पतीला हॉटेलच्या खोलीत प्रियकरासोबत आढळली पत्नी, अन् मग…; व्हिडीओ व्हायरल

‘ही’ तरुणी चक्क नग्नावस्थेत डोंगर सर करते! जाणून घ्या काय आहे कारण?

चेहऱ्या ऐवजी ‘या’ ठिकाणी मास्क लावल्यामुळे महिला होतीय सोशल मीडियावर ट्रोल