अकोला | 2020 या वर्षात अनेक दिग्गजांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अनेक बड्या राजकीय नेत्यांचं या वर्षात नि,धन झालं आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे भारतीय जनता पार्टी चिंतेत असतानाच भाजपला मोठा धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे आणि माळी समाजाचे वरिष्ठ आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचं सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं नि.धन झालं आहे. जगन्नाथ ढोणे यांच्यावर आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पातूर येथील डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरात अं.त्यसंस्कार कारण्यात आले.
डॉ. जगन्नाथ ढोणे भारतीय जनता पार्टीचे आघाडीचे नेते होते. भाजपमध्ये सध्या ते प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच अकोला जिल्हा भाजप सिंचन परिषदेचे संयोजक म्हणून कार्यभार सांभाळत होते. मात्र, ढोणे यांच्यावर अचानक ओढवलेल्या मृ.त्यूमुळे भारतीय जनता पार्टीवर शोककळा पसरली आहे.
नुकतंच रेल्वे स्थानकाचा एक कार्यक्रम अकोल्यात पार पडला होता. या कार्यक्रमाला देखील ढोणे यांनी हजेरी लावली होती. वयाची 60 वर्ष ओलांडून देखील ते भाजपमध्ये एक सक्रीय नेते होते.
डॉ. जगन्नाथ ढोणे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि मग भाजप असा राजकीय प्रवास केला आहे. देशातील चारही आघाडीच्या राजकीय पक्षांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा या नेत्याला चांगलाच अनुभव होता.
1990 साली अकोला विधानसभा मतदार संघातून डॉ. जगन्नाथ ढोणे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर गणगणे यांचा पराभव केला होता. यावेळी ते प्रथमच आमदार म्हणून निवडून आले होते.
यानंतर 1995 साली डॉ. जग्गानाथ ढोणे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. 1999 मध्ये ढोणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला होता. राष्ट्रवादी नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ढोणे अगदी जवळचे होते. मात्र, काही कारणास्तव ढोणे यांनी राष्ट्रवादीलाही रामराम ठोकला आणि शेवट भाजपचा झेंडा हाती घेतला.
डॉ. जगनाथ ढोणे हे एम.एस. सर्जन होते. काही दिवसांपूर्वीच ढोणे यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर ढोणे यांनी यशस्वीपणे मात केली होती. मात्र, अखेर सोमवारी रात्री ढोणे यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यातील लाॅजवर पोलिसांनी टाकला छापा, आत सुरु असलेला प्रकार पाहून पोलीसही हैराण!
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच सोन्याला उतरती कळा, विचार करणार नाही इतकं स्वस्त!
तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली माझ्या वडिलांनीच मला…
दसऱ्याच्या मुहूर्तावर दिशा बोलली आणि ‘ती’ चर्चा पुन्हा एकदा रंगली!