1.20 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपात ‘या’ अभिनेत्याला अटक

मुंबई: ‘मर्डर २’ ‘पीएम नरेंद्र मोदी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या प्रशांत नारायणन या अभिनेत्याविरोधात थॉमस पेनिकर या मल्याळम चित्रपट निर्मात्याने फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. या अभिनेत्याला त्याच्या पत्नीसह अटक करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनी मुंबईत ही कारवाई केली असून प्रशांत आणि त्याच्या पत्नीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात थॉमस पेनिकर आणि प्रशांतने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली. त्यादरम्यान प्रशांतने थॉमसला गुंतवणुकीचा सल्ला दिला.

माझ्या सासऱ्यांची मुंबईत एक कंपनी आहे. तिथे गुंतवणूक केल्यास तुम्हाला कंपनीचा संचालक बनवलं जाईल असं आमिष दाखवून प्रशांतने त्यांच्याकडून 1.20 कोटी रुपये लुटले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रशांत आणि त्यांच्या पत्नीला ट्रान्झिट वॉरंटवर केरळला नेण्यात आलं आहे. दोघांना 20 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-