Top news कोरोना देश

या एका रोपट्यामुळे होऊ शकतो कोरोनाचा नायनाट; भारतीय तज्ज्ञांचा दावा

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. मात्र अजून देखील या महामारीवर लस तयार झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा झटका बसला आहे. यामुळे अनेक देश या महमारीवर लवकरात लवकर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशातच आता भारतातील दोन विद्यापीठातील तज्ञांनी महत्वाचा शोध लावला आहे. गुरु गोविंद सिंग युनिव्हर्सिटी आणि पंजाब युनिव्हर्सिटी या दोन विद्यापीठातील प्राध्यापकांनी रोपट्यांवर संशोधन केलं आहे. संशोधनादरम्यान रोपट्यांतील घटक कोरोनाचा नायनाट करू शकतात, असा दावा या प्राध्यापकांनी केला आहे.

पंजाब युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ बायोलॉजी सिस्टम्सचे अध्यक्ष डॉ.अशोक कुमार आणि गुरु गोविंद सिंग युनिव्हर्सिटीतील डॉ. सुरेश कुमार यांनी रोपट्यांवर अभ्यास केला. यावेळी रोपट्यांमध्ये जवळपास 50 पायथोकेमिकल आहेत जे व्हायरसचा नाश करू शकतात, असं या दोन प्राध्यपकांनी सांगितलं आहे.

पायथोकेमिकल आपल्याला अनेक बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून वाचवू शकतात. पायथोकेमिकल रासायनिक तत्वाने कोरोनाच्या प्रोटीनवर हल्ला करून त्याला रोखू शकेल. तसेच कोरोनाचा प्रोटीन इतर प्रकारच्या तत्वाशी एकत्र झाल्यानंतर निष्क्रिय होतो. यामुळे संक्रमण पसरण्याचा धोका आपोआप कमी होतो, अशी माहिती डॉ. सुरेश कुमार यांनी दिली आहे.

3 सप्टेंबर रोजी ‘आंतराष्ट्रीय जर्नल फायटोमेडिसिन’मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं होतं. पायथोकेमिकलचा हा अभ्यास सध्या संगणकावर करण्यात आलेला आहे. मात्र लवकरच याचा प्रयोग प्राणी आणि माणसांवर केला जाणार आहे. यामुळे हा उपाय किती प्रभावी ठरू शकतो, हे समजू शकेल.

दरम्यान, देशात कोरोना अत्यंत भयानक वेगानं वाढतो आहे. भारत सरकार कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. देशात अनेक संशोधन केंद्र कोरोनाच्या लसीवर काम करत आहेत. यामुळे लवकरच कोरोनाची लस देशातील नागरिकांसाठी उपलब्ध होवू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

अभिनेता अर्जुन कपूरनंतर आता त्याच्या ‘या’ गर्लफ्रेंडलाही कोरोनाची लागण

सुशांत प्रकरणी डाव फिरला! ‘या’ व्यक्तीनंही दिला रिया विरुद्ध जबाब म्हणाला…

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर ठार करेनच पण ‘मातोश्री’सुद्धा उडवून टाकेन”

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रिया चक्रवर्ती स्वतः अटकेसाठी तयार

जम्बो कोविड सेंटरनं माणसं अक्षरशः तडपडून मारली; एक काळजाचा थरकाप उडवणारा अनुभव