नवी दिल्ली | सध्या देशात सर्वत्रच आयपीएलचा माहौल आहे. अनेक खेळाडू आयपीएलमध्ये आपल्या उत्तम खेळीचं प्रदर्शन करत आहेत. देशात आयपीएलचे अनेक चाहते आहेत. आयपीएल मधील संघांबरोबरच त्यांच्या चाहत्यांमध्येही सोशल मीडियावर संघांच्या खेळीवरून शाब्दिक ल.ढाई पाहायला मिळत आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये सीएसकेचं नेतृत्व करणारा महेंद्र सिंग धोनी एका सामन्यात उत्तम प्रदर्शन करू शकला नाही. यामुळे एका न.राधमानं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या 5 वर्षीय मुलीवर ब.लात्कार करण्याची धम.की दिली आहे. याप्रकरणी गु.न्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आ.रोपीला गुजरात मधून अ.टक केलं आहे.
7 ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान सामान खेळला गेला होता. चेन्नईच्या संघानं हा सामना केवळ 10 धावांनी गमावला होता. कोलकत्ता नाईट रायडर्स विरोधात धोनीच्या सीएसके टीमचा पराभव झाल्यानंतर सीएसकेवर सोशल मीडियावर प्रचंड टी.का करण्यात आली होती.
सीएसकेच्या विरोधी संघांच्या चाहत्यांनी सीएसकेची सोशल मीडियावर प्रचंड चेष्टा केली होती. मात्र, एका नराधमानं त्याच्या खालची पातळी गाठत धोनीच्या मुलीवर ब.लात्कार करण्याची ध.मकी दिली होती.
आ.रोपीनं महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर धमकीचे मेसेज केले. मेसेजमध्ये आरोपीनं धोनीच्या पाच वर्षीय मुलीवर ब.लात्कार करण्याची गोष्ट बोलली आहे. यानंतर रांची येथील रातू रोड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गु.न्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी गु.न्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ध.मकी देणाऱ्या नराधमाचा शोध सूरु केला. तपासादरम्यान हा आ.रोपी गुजरात मधील असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर आ.रोपीला गुजरात मधील कच्छ येथून अ.टक करण्यात आली आहे.
दरम्यान, कोलकत्ता विरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा पराभव झाल्यानंतर चेन्नई टीमच्या खेळाडूंना प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. केदार जाधवला तर सोशल मीडियावर या सामन्यातील ख.लनायक ठरवण्यात आलं होतं. केदार जाधव या सामन्यात 12 चेंडूत केवळ 7 धावा करू शकला होता.
सीएसकेच्या इतरही खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. धोनीला तर प्रचंड टीका सहन करावी लागली आहे. मात्र, धोनी बरोबरच त्याच्या कुटुंबालाही या सामन्यात सीएसकेचा पराभव झाल्यानं अत्यंत खालच्या दर्जाची टीका सहन करावी लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! रिया आणि सुशांत बद्दलचा ‘तो’ दावा खोटा
सुशांत प्रकरणी ‘या’ प्रसिध्द अभिनेत्यानं केलं वा.दग्रस्त वक्तव्य म्हणाला…
गर्लफ्रेंड आलियानं रणबीरला दिलं असं गिफ्ट; पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
कोरोनासंदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर; डिसेंबर-जानेवारीत…
कंगनानं आता ‘त्या’ प्रकरणी दीपिकाला डिवचलं, दीपिकाचं नाव न घेता कंगना म्हणाली…