मुंबई : : जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारताच्या अभियानाला गुरुवारपासून प्रारंभ करताना वेस्ट इंडिजविरुद्ध परिपूर्ण समन्वयासह विजयी सुरुवात करण्याचा निर्धार कर्णधार विराट कोहलीने केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतील हा पहिला सामना आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. या कसोटी मालिकेत विराट कोहलीसह, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत या भारतीय खेळाडूंना इतिहास घडवण्याची संधी आहे.
विराट कोहलीला सर्वात यशस्वी कर्णधार बनण्याची संधी आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराने आतापर्यंत 46 कसोटीपैकी 26 सामने जिंकले आहेत. त्याला महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक 27 कसोटी विजयाचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. पहिला कसोटी सामना जिंकला तर विराटला धोनीच्या विक्रमाशी बरोबरी साधता येईल.
जसप्रीत बुमराहने 10 कसोटीत 49 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 11 व्या कसोटीत विकेट्सचे अर्धशतक साजरे केल्यास सर्वात जलद हा पल्ला गाठणारा तो दुसरा भारतीय जलदगती गोलंदाज ठरेल. नरेंद्र हिरवानी यांच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल. भारतासाठी सर्वात जलद 50 विकेट्स या आर अश्विनने ( 9 सामने) घेतल्या आहेत.
रविंद्र जडेजाला कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 8 विकेट्सची आवश्यकता आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेत त्याने ही कामगिरी केल्यास 200 विकेट्स घेणारा तो भारताचा दहावा गोलंदाज ठरेल. जडेजाने 41 कसोटीत 192 विकेट्स घेतल्या आहेत.
रिषभ पंतने या मालिकेत आठ फलंदाजांना माघारी पाठवून दिल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 फलंदाजांना माघारी पाठवण्याचा भारतीय यष्टिरक्षकाचा विक्रम तो नावावर करू शकतो. त्याने 9 कसोटीत 42 फलंदाजांना माघारी पाठवले आहे. पहिल्याच कसोटीत पंतने हा पल्ला पार केल्यात 10 कसोटींत 50 बळी नावावर करणारा तो दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचर व ऑस्ट्रेलियाचा टीम पेन यांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करेल.
महत्वाच्या बातम्या-
-“लाव रे तो व्हीडिओमुळेच ‘ईडी’कडून राज ठाकरेंची चौकशी”
-विंडीजच्या ‘या’ गोलंदाजाची पहिल्या कसोटीतून माघार
-बाळासाहेबांचे विचार अजूनही जिवंत आहेत- सुप्रिया सुळे
“राजकारण बाजूला, कुटुंब म्हणून आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी”
-औरंगाबादमध्ये काँग्रेसला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी!