कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लाॅकडाऊन करण्यात आलं होतं. या काळात अनेक घडामोडी झालेल्या पाहिल्या मिळाल्या. यातच आता लाॅकडाऊन उठल्यानंतर पेट्रोलच्या किमतींत देखील वाढ झालेली पहायला मिळाली. देशात पेट्रोलच्या किंमतीने प्रति लिटर शंभरचा आकडा पार केलाय. यामुळे सर्वसामान्य लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
पेट्रोलच्या महागाईमुळे आता बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतात लाॅन्च झाल्यापासून ग्राहक त्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत. काही तासांच्या चार्जिंगवर या गाड्या बऱ्याच लांबचा पल्ला गाढतात. अश्या इलेक्ट्रिक स्कूटर्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Ola Electric Scooter – इलेक्ट्रिक स्कूटर्सला बाजारात मिळणारा प्रतिसाद पाहता ओला लवकरच भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. या गाडीविषयी ओला लवकरच अधिकृत माहिती देणार आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.50 लाख असेल असा अंदाज आहे. बाजारात मिळणारा प्रतिसाद पाहता इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच भारतीय बाजारात लाॅन्च होईल अशी शक्यता आहे.
Okinawa Cruiser – ही स्कूटर एका तासाला 100 कि.मी प्रती वेगाने धावू शकते. या स्कूटरची 2 ते 3 तासात संपूर्ण बॅटरी चार्ज होते. ही स्कूटर देखील भारतीय बाजारात लवकरच लाॅन्च होईल. या गाडीत 3KWची ब्रशलेस मोटर आहे. पॉवर देण्यासाठी 4KW लिथीयम आयन बॅटरीच्या वापर केला आहे.
Vespa Electric Scooter – वेस्पा इलेक्ट्रिक भारतात नवीन असली तरी युरोपियन बाजारात इलेक्ट्रिक वेस्पा आधीपासून आहे. भारतात प्रसिद्ध असलेली वेस्पा स्कूटर नवीन पद्धतीनं लाॅन्च होणार असून पियाजियो इंडिया बऱ्याच वेळेपासून यावर काम करत आहे.
कंपनी वेस्पात 4.3 इंचचे डिजिटल इंस्ट्रूमेंट पैनल आणि ब्लूटूथ स्मार्टफोन कनेक्टिविटी वापरणार आहे. इलेक्ट्रिक वेस्पामध्ये 4kw ब्रशलेस डीसी इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. ही मोटर 200nm पेक्षा अधिक टॉर्क देते. या गाडीची सुरुवातीची किंमत अंदाजे 90,000 रुपये असेल.
Hero Electric Scooter AE-29 – हिरो इलेक्ट्रिक स्कूटर या गाडीत 55 कि.मी वेगाने धावण्याची क्षमता आहे. गाडीला पॉवर देण्यासाठी लाईट वेट पोर्टेबल लिथीयम आयन 48/3.5 kWh बॅटरी आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 85,000 रुपये असू शकते. या स्कूटरची पूर्ण बॅटरी चार्जिंग करायला 4 तास वेळ लागेल.
येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक स्कूटर्सला भारतीय बाजारात प्रचंड वाव येण्याची शक्यता आहे. या गाड्यांना ग्राहकांकडून देखील चांगलाच प्रतिसाद भेटताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –
उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5 सीटर कार, 5 लाखांहून आहे कमी किंमत
नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे
आता भारतात गाड्या 3 लाखापेक्षा स्वस्त; जाणून घ्या ‘त्या’ कोणत्या आहेत
10 हजारांनी स्वस्त झालं होतं सोनं; आता पुन्हा एकदा महागलं, जाणून घ्या नवे दर