दारूची बाटली हातात घेऊन डान्स करण्याऱ्या तरूणीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल

नवी दिल्ली | सोशल मीडियावर आजकाल अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही गाणं म्हणताना, अँटिंग करतानाचे असतात. त्यातील काही व्हिडीओ खूप प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर लगेचंच आपल्या अंगावर काटा येईल असे असतात.

हल्ली सगळीकडे लगीन सराई सुरू आहे. कोरोनाच्या काळात अनेक मुला-मुलींचे लग्नांचे बार उडले आहेत. लग्न म्हटलं की, नाड-गाण हे आपलंच. त्याचप्रमाणे लग्न ठरलेल्या नवरा-नवरीपेक्षा त्या दोघांच्या नातेवाईकांना जास्त धमाल, मस्ती करता येत असते.

आतातर प्रिवेडिंगचा नवीन ट्रेंडच निघाला आहे. त्यामध्ये लग्ना आधिच नवरा-नवरीचे वेगवेगळ्या पोझेसमध्ये फोटो काढून, ते फोटो सोशल मीडिया साईटवर शेअर करायचे. तसेच हल्ली इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफोमवर तर रिल्सची फॅडंच निघाली आहे. लग्नातील रिल्सही अनेकजण बनवून त्या व्हिडीओला साजेस गाणं लावून तो व्हिडीओ पोस्ट करतात.

आपल्याला माहित आहे की, लग्नात नवरा-नवरीचे मित्रमंडळी खूप धमाल करत असतात. त्यांच्याशिवाय लग्नाला शोभाही नसते. आपण पाहिले असेल वरातीमध्ये नाहीतर लग्न मंडपात मित्र नाचत असतात. परंतू काय तुम्ही मुलीला दारू पिऊन नाचाताना पाहिलं आहे का?.

नसेल पाहिल तर सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक तरूणी दारू पिऊन एका लग्नात नाचत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तिच्या हातामध्ये दारूची बाटली असल्याचंही पाहायला मिळत आहे.

व्हिडीओमधील तरूणीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून, ती ज्याप्रकारे डान्स करत आहे. त्यावर असं वाटतं आहे की तिने बाटलीतील काही दारू प्यायली असावी. ती डान्स करत असताना मध्येच एक तरूण येतो आणि तिच्यावर पैसो ओवाळतो आणि जातो. त्याच्याच पाठोपाठ एक माणूस येतो आणि तोही तिच्यावरून पैसे ओवाळून जातो.

तरूणी दारूची बाटली घेऊन डान्स करत आहे. तिने प्रत्यक्षात दारू प्यायली नसल्याचं समजतं आहे. ती फक्त दारूची बाटली घेऊन दारू प्यायली असल्याचं नाटक करत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘smilearora’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला अनेकांनी पाहिलं असून, बऱ्याच जणांनी या व्हिडीओला कमेंटही केल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CRtuVCUHsnM/?utm_source=ig_embed&ig_rid=d09f6581-9a6a-4d1f-8171-4c0137f32cd2

महत्वाच्या बातम्या-

प्रेम विवाहाला पाठिंबा दिला म्हणून दोघा भावांना मिळाली ‘ही’ अजब शिक्षा, वाचा सविस्तर

तुम्हीही ऑनलाईन फूड ऑर्डर करत असाल तर, ‘हा’ व्हिडीओ नक्की बघा

ऐकावं ते नवलंच! लग्नात वऱ्हाडी म्हणून चक्क ‘या’ प्रण्यांनी लावली हजेरी, पाहा व्हिडीओ

नवरदेवाला पाहताच भर मंडपात नवरीने धरला ठेका अन् मग…; पाहा व्हिडीओ

राधिका आपटेचा ‘तो’ न्यूड सीन सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल