मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. लोकायुक्त कायद्यासाठी राज्यभरात आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचं अण्णा हजारेंनी सांगितलं होतं. त्यातच आता अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
गरज पडल्यास लोकपाल कायद्यासाठी पुन्हा उपोषण करण्याची तयारी आहे. 85 व्या वर्षी उपोषण होणार नाही हीचं इच्छा, असं अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
संसदेत झालेल्या लोकपाल लोकायुक्त कायद्याप्रमाणे केंद्रात लोकपाल कायदा झाला. तसेच राज्यामध्ये लोकायुक्त कायदा करणे आवश्यक आहे, असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.
देशातील काही राज्यांनी संसदेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे लोकायुक्त कायदे केलेले आहेत.
महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी मी राळेगणसिद्धीमध्ये 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2019 याकालावधीमध्ये उपोषण केलं होते, असं अण्णा हजारेंनी पत्रात नमूद केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मसुदा समिती तयार करत आहोत, असं लेखी आश्वासन दिल्यामुळे सात दिवसांनंतर मी माझे उपोषण मागे घेतले होतं, असंही अण्णा हजारेंनी पत्रात नमूद केलं आहे.
मसुदा समितीचा काही भाग तयार झाला होता. मात्र, अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवरून जाऊन ठाकरे आल्यानंतर सदर माहिती आपणास दिली होती, असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, आपण मला पत्र पाठवून आश्वासन दिले होते की, लोकायुक्त कायदा करू. आपणांस विनंती आहे की, राहिलेला मसुदा दोन तीन बैठका घेऊन पुर्ण करावा, अशी विनंती अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
लोकायुक्त कायदा महत्त्वाचा असल्याने मी तीनवेळा दिल्ली आणि महाराष्ट्रात प्राणांतिक उपोषण केले. आता पर्यंत तीनवेळा प्राणांतिक उपोषणे झाली आहेत. आता चौथे उपोषण होण्याची वेळ येऊ नये ही, विनंती, असं अण्णा हजारे पत्रात म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित पवारांच्या खोचक टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ एका निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ
शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
“…तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू”
“स्वत:च्या बायकोला लोक बोलली तर इतरांना पुढं करता का?”