मुंबई | गेल्या वर्षात राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. राज्यातील अनेक धरणे आणि नद्या तुडूंब झाल्या होत्या. काही ठिकाणी अतिवृष्टीचाही फटका बसला. चांगला पाऊस झाल्याने तलाव आणि विहिरींना वर्षभर पुरेल इतका पाणी साठा झाला. त्यातच आता भारतीय हवामान विभागाकडून येणाऱ्या वर्षातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य आणि परिणामात्मक असणार आहे.
हा पाऊस दिर्घ कालावधीच्या सरासरी 99 टक्के म्हणजेच 87 सेंटीमीटर असणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच खासगी हवामान संस्था स्कायमेटने यावर्षीच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात यंदाचा मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. यावर्षीच्या पाऊसाची सुरूवात चांगली होणार असून जून महिन्यातच सर्वाधिक पाऊस अपेक्षित आहे, असं स्कायमेटकडून सांगण्यात आलं आहे.
यंदा देशात 98 टक्के पाऊस राहण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. जुन ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 880.6 मिलीमिटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
21 फेब्रुवारी 2022 ला स्कायमेटनं पहिला मान्सून अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर त्यांनी वेबसाईटवर अधिकृतरित्या माहिती दिली आहे.
दरम्यान, शेती हा व्यवसाय निसर्गावर आधारित आहे. मान्सूनच्या आगमनाची शेतकरी आणि नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातच यंदाचा पाऊस चांगला राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“…आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या”, संजय राऊत RSS वर बरसले
भाजप-मनसे युती होणार?; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…
“जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही तो भोंगा”
“स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात”
Jayashree Patil | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार