‘हा’ तरुण केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेला अन् खुर्चीवर बसताच रडू लागला; पाहा मजेशीर व्हिडीओ

मुंबई | सलून म्हटलं की लहान मुलं मोठ मोठ्याने रडू लागतात. सलूनच्या दुकानातील धार धार केस कापण्याची हत्यारे पाहून चिमुरड्यांना भीती वाटते आणि ते केस कापण्यासाठी नको म्हणून भोंगा पसरतात. सलूनच्या दुकानात चिमुरड्यांचं रडणं हे काय नवीन नाही.

मात्र, सध्या सोशल मिडियावर सलूनच्या दुकानात मोठ्याने भोंगा पसरलेल्या एका युवकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये केस कापण्यासाठी बसलेला एक युवक चक्क मोठं मोठ्याने रडताना दिसत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

ही घटना नेमकी कोठे घडली आहे, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र, सलूनमध्ये नेमकं काय घडलं?हे तुम्ही व्हिडीओमध्येच पाहू शकता.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेला आहे. सलूनच्या दुकानात एक न्हावी त्याचे केस कापताना दिसत आहे. याचवेळी दुकानात पाठीमागे काही गाणी लावली असतात.

सलूनच्या बहुतांश दुकानात टाईमपाससाठी गाणी लावली जातात. अशीच गाणी हा तरुण केस कापत असताना देखील पाठीमागे चालू असतात. तरुण केस कापायला बसलेला असतानाच नेमकं पाठीमागे एक सेंटी गाणं लागलेलं असतं.

बॉलिवूडचं हे सेंटी गाणं ऐकून हा तरुण खूप इमोशनल होतो. तो स्वतःला आवरू शकत नाही आणि तिथेच मोठं मोठ्याने रडू लागतो. हा तरुण एकदम ओक्साबोक्शी होऊन रडताना दिसत आहे.

युवक रडायला लागल्यानंतर केस कापणारा व्यक्तिसुद्धा काही वेळ थांबतो. त्यानंतर हा युवक टेबलवर डोकं ठेवून रडू लागतो. हा युवक रडू आवरण्याचा प्रयत्न देखील करतो. मात्र, त्याला काही रडू आवरत नाही.

युवक रडत असताना सलूनच्या दुकानात उपस्थित इतर सर्वजण त्याच्यावर हसू लागतात. यावेळी काही लोक या युवकाचा व्हिडीओ देखील शूट करतात आणि सोशल मीडियावर शेअत करतात. सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यावर नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत. तुम्हाला देखील हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

ऐन लग्नसराईच्या काळात सोनं 50 हजारापार जाण्याची शक्यता, वाचा आजचा दर

अरे वाह! या’ स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कुटर विषयी तुम्हाला माहीत आहे का? नक्की वाचा

मध्य प्रदेश पोलिसांची गुं.डागिरी! रिक्षा चालकाला भर चौकात मारला; व्हिडीओ व्हायरल

पुढील चार दिवस ‘या’ भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा, वाचा सविस्तर

‘मिसेस श्रीलंका’च्या मंचावर राडा! विजेतीचा मुकूट…