मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये पत्रकार घेणार असल्याची माहिती दिली होती. अशातच संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा मोठा गैरवापर होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकार त्यांना पाडायचं आहे. सरकार आम्ही घालवू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
170 चं बहुमत असताना भारतीय जनता पक्षाचे लोक तारखा देत आहेत. कोणाच्या भरवश्यावर तुम्ही या तारखा देत आहात?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
दिल्लीमध्ये भाजपच्या नेत्यांकडून सरकार पाडण्यासाठी मदत करा, असं सांगत आहेत. साधारण 20 दिवसांपुर्वी भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक मला भेटले. त्यांनी मला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला की, आम्ही हे सरकार पाडण्याची तयारी केली आहे.
तुम्ही आम्हाला सरकार पाडण्यासाठी मदत करा. तुम्ही काही लोेकांनी आम्हाला मदत केली तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, असं संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांचं नाव न घेता केला आहे.
दरम्यान, कितीही आमच्या पाठीवर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहता की, शिवसेना असेल ठाकरे परिवार असतील. अगदी पवार साहेबांच्या कुटूंबापासून सगळ्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी हल्ले केले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”
“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा
“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”
‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ
निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला