“ज्यांच्या मनात करुणा त्यांना होणार नाही कोरोना”

मुंबई | मागिल महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे देशातील करोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसतं आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना काही निर्बंध घालून दिले आहेत.

अशातच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. ज्यांच्या मनात करुणा त्यांना होणार नाही कोरोना, असं भगतसिंग कोश्यारी यांनी म्हणाले आहे. 1 मार्च रोजी राजभवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, दिवसभरात 8 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. लोकांनी कोरोना महामारीचा मोठा धसका घेतला होता. मात्र मी कोरोनाला कधीही घाबरलो नसल्याचंही भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

टाळेबंदीच्या काळातही मी लोकांना भेटणे सोडले नाही. आत तर राजभवन हे लोकभवन झाले आहे. लोक मला विचारतात तुम्हाला कोरोनाची भिती वाटतं नाही की?, त्यावेळी मी त्यांना ज्यांच्या मनात कोरुणा आहे, त्यांना कोरोना होत नाही, असं उत्तर देतो.

तसेच कोरोनाला घाबरु नका तर काळजी घ्या, खबरदारी घ्या, हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करा, असं आवाहनही राज्यपालांनी केलं आहे.

देशात 1 मार्च रोजी दुसऱ्या टप्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये 60 वर्ष वयोगटातील आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसेच जे नागरिक गंभीर आजाराशी लढणाऱ्या आणि 45 वर्ष वयोगटातील लोकांनाही लस दिली जाणार आहे.

दरम्यान, सुरु असलेल्या लसीकरणाच्या मुद्यावरुन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मलिकार्जुन खरगे यांनी केलं आहे. देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ज्येष्ठ व्यक्तींऐवजी तरुणांना प्राधान्या दिलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला होता.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ भाजप खासदाराचं कोरोनामुळं निधन

पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी भाजपच्या ‘या’ नेत्यांवर गु.न्हा दाखल

कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर, केला फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, पाहा काय आहेत आजचे दर

आमदाराच्या घोरण्यामुळे विधानसभेची शांतता झाली भंग अनं…