गावी जाण्याच्या हट्टापायी मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांची हजारोंची गर्दी

मुंबई | कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. पण मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली आहे. तसेच गावाकडे परत जाण्यासाठी हट्ट केला जात आहे. यामुळे वांद्रे पश्चिममध्ये भागात बस डेपोजवळ नागरिकांची गर्दी नियंत्रणात आणताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले.

देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन कालावधी वाढवण्यात आला. याचाही या कामगारांनी निषेध केला आहे. या बिहारी आणि बंगाली परप्रांतीय कामगारांनी आपआपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेगाडी सुरु करण्याची मागणी केली.

या लॉकडाऊन कालावधीत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना योग्य आहार व जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत. वांद्रा पोलिस आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

दरम्यान, वांद्रा येथे हजारोच्या संख्येने जमा झालेले कामगार जवळच्या वस्तीमधील असल्याचं सांगितलं जात आहे. लॉकडाऊनमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी संबंधित लोक त्यांच्या मूळगावी जाण्याचा हट्ट करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-पुण्यामधे चक्क दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक

-…तर त्यांनी नको त्या फुकटच्या सुचना करु नये- जितेंद्र आव्हाड

-धक्कादायक! पुण्यात 27 वर्षीय तरूणासह 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू!

-नरेंद्र मोदींनी राहुल गांधींनी सांगितलेला ‘तो’ सल्ला ऐकायला हवा होता- बाळासाहेब थोरात

-मोदींनी वाढवलेल्या लॉकडाऊनवर एकनाथ खडसे म्हणाले…