महेश मांजरेकर यांना 35 कोटी रुपये खंडणी देण्याची धमकी; ‘या’ अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने आला होता मेसेज!

मुंबई | महेश मांजरेकर नेहमीच आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आले आहे. अभिनयाबरोबरच महेश मांजरेकर उत्तम दिग्दर्शक आणि निर्माता सुद्धा आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांना धमकीचे मेसेज येत आहेत.

महेश मांजरेकर यांना गेल्या दोन दिवसांपासून व्हाट्सअॅपवर अनोळखी नंबर वरून काही मेसेज येत आहेत. या मेसेजद्वारे 35 कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात येत आहे. मांजरेकर यांना असे मेसेज येवू लागल्यानंतर त्यांनी तात्काळ दादर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने हे धमकीचे मेसेज येत असल्याच मांजरेकर यांनी पोलिसांना सांगितलं आहे. महेश मांजरेकर यांनी तक्रार देताच पोलिसांनी तात्काळ मांजरेकरांना खंडणी मागणाऱ्या टोळीचा तपास सुरु केला आहे.

खंडणीविरोधी पथकाने तात्काळ कार्यवाही करत याप्रकरणी रत्नागिरीतून एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव मिलिंद तुळसकर असं आहे. आरोपीनं मांजरेकर यांना फसवण्यासाठी ज्या अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाचा वापर केला होता त्या अबू सालेमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं तपासादरम्यान पोलिसांच्या समोर आलं आहे.

दरम्यान पोलीस याप्रकरणी आणखी कोणाचा संबंध होता का, आरोपीने नक्की कोणत्या उद्देशानं मांजरेकर यांना धमकी दिली होती, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याचा खरंच यमागे काही हात नाही ना, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

महेश मांजरेकर यांनी हिंदी बरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अस्तित्व, वास्तव, दबंग, वॉन्टेड, नटसम्राट, काकस्पर्श इत्यादी चित्रपटांच्या माध्यमातून महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

महत्वाच्या बाततम्या-

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही?, सर्वोच्च न्यायालयाने घेतला महत्वाचा निर्णय

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही?, सर्वोच्च न्यायालयाने घेतला महत्वाचा निर्णय

“…तर पुढील 50 वर्ष कॉंग्रेसला विरोधक म्हणूनच काढावी लागतील”

रियानं अखेर सांगितला त्या ‘एयु’चा अर्थ; आदित्य ठाकरेंविषयी महत्वाचा खुलासा

‘माझ्या ड्रिंकमध्ये ‘तो’ काहीतरी मिसळून मला प्यायला द्यायचा’; बॉलीवूड क्वीन कंगनाचा धक्कादायक खुलासा