‘मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू’, कराचीतून फोन आल्याचा संशय

मुंबई | मुंबईतील ताज हॉटलेलला पाकिस्तानातून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अज्ञातांनी रात्री उशिरा हॉटेलमध्ये फोन करुन मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू, अशी धमकी दिली.

धमकीचा फोन आल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ताज हॉटेलच्या सुरक्षेत वाढ केली आहे. दरम्यान, हा फोन कराचीतून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ताज हॉटेलमध्ये धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने आपलं स्वत:चं नाव ‘सुलतान’ असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय आपण पाकिस्तानातून बोलतोय असंही तो म्हणाला. त्याने ताज हॉटेलमध्ये पुन्हा 26/11 सारखा हल्ला करु, अशी धमकी दिली.

कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेला अतिरेकी हल्ला सगळ्यांनी बघितला. आता ताज हॉटेलमध्येही 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार, असंदेखील तो फोनवर म्हणाल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

-लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनने केला दावा

-शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप, म्हणाले….

-राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही- संजय राऊत

-गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

-टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…