“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लिलावती रुग्णालयातील डाॅक्टरांना धमक्या”

मुंबई | आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हनुमान चालीसा प्रकरणावरुन चांगलेच अडचणीत आलेले पहायला मिळाले.

देशद्रोहाप्रकरणी राणा दाम्पत्यांना अटकही करण्यात आली होती. 13 दिवसांनंतर राणा दाम्पत्यांची तुरुंगातून सुटका झाली.

तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर भाजप आणि शिवसेनेत जोरदार वाद रंगल्याचं पहायला मिळत आहे.

रवी राणांनी आता मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लिलावती रुग्णालयातील डाॅक्टरांना धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांमध्ये सत्तेचा अहंकार आला आहे. तो अहंकार महाराष्ट्राची जनता मोडून काढेल हे लक्षात ठेवा, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे काही लोकं मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन लीलावती रुग्णालात गेले. त्यांनी डॉक्टरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एमआरआयचे फोटो बाहेर कसे गेले? नवनीत राणा रुग्णालयात दाखल कशा झाल्या, काय इलाज केला? असे प्रश्न डॉक्टरांना विचारले, असंही राणांनी सांगितलं.

दरम्यान, रवी राणांनी केलेल्या आरोपांवर अद्याप शिवसेनेनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे शिवसेना या आरोपांवर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

  कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  “बाॅलिवूडला मी परवडणार नाही”; महेश बाबूचं वक्तव्य चर्चेत

  “राज ठाकरे कोणी दबंग नेता नसून, उंदीर आहे उंदीर”

  “शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिलेला नाही”