शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट लोकांच्या गराड्यात घुसली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

रायगड | शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ म्हणून राज्यात बैलगाडा शर्यतीला ओळखण्यात येतं. नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. अशातच राज्यात आता मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यानंतर बराच काळ बैलगाडा प्रेमींसाठी शर्यतीसाठी वाट पहावी लागली होती. राज्य सरकारने देखील बैलगाडा शर्यतीवरील निर्बंध हटवावेत यासाठी प्रयत्न केले होते.

राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये बैलगाडा शर्यतीवरून जोरदार संघर्ष पहायला मिळला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अटी आणि शर्तींच्या अधिन राहून शर्यत घेण्यास परवानगी दिली होती.

शर्यत घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत आहे. अशातही मोठ्या प्रमाणात राज्यात शर्यतींचं आयोजन करण्यात येत आहे. परिणामी सध्या प्रशासनाला सतर्कता बाळगावी लागत आहे.

रायगड जिल्ह्यातील नांदगाव येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान मोठा अपघात झाला आहे. नांदगाव येथील भाजप कार्यकर्ते शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्तानं भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं.

बैलगाडा शर्यत चालू असताना नागरिकांच्या गर्दीमध्ये एक बैलगाडी अचानक घुसते आणि मोठा गोंधळ उडतो. बघ्यांचा एक समुह शर्यतीचा आनंद घेण्याच्या नादात बैलगाडीकडं लक्ष देत नाही. परिणामी अपघात घडला आहे.

बैलगाडीच्या धडकेत तीन जणांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार चालू आहेत. बैलगाडीनं धडक दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, बैलगाडा शर्यतींसाठी परवानगी दिल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडण्याची भीती वर्तवण्यात येत होती. अशातच ही घटना घडल्यानं सर्वत्र बैलगाडा शर्यतींच्या नियमावलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

आता सुट्टी नाय, होत्याचं नव्हतं करीन पण…- किरण माने

 मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर

“वाईन दारू नसेल तर मरणाऱ्या आईला ती गंगाजळऐवजी पाजाल का?” 

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…