भाजपला शह देण्यासाठी ‘या’ शहरात पवारांच्या तीन पिढ्या उतरल्या मैदानात!

पुणे | मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.

राज्यातील अनेक महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत. विशेषत: पुण्यात.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी पवारांच्या तीन पिढ्या मैदानात उतरल्या आहेत. अजित पवारांसारखे सक्षम नेते असतानाही शरद पवारांना शहरात यावं लागत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा मोठा पराभव झाला. याचा मोठा सल अजित पवार यांना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच पार्थ पवार यांना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली.

वर्षापासून पार्थ पवार तरुणांना सोबत घेऊन काम करत आहेत. प्रत्येक वॉर्डात फिरून वॉर्डातील समस्यांची माहिती घेत आहेत. यामुळे भाजपला शह देऊन महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या तीन पिढ्या मैदानात उतरल्याने भाजपपुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

भावाच्या अटकेनंतर सुहाना खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मधुमेही रूग्णांंनी आहारात ‘या’ फळांचा समावेश करावा, साखर नियंत्रणात राहिल

वृद्ध दाम्पत्याचा चिलम फुंकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

एनसीबी चौकशीवेळी आर्यन खानने कुटुंबाबद्दल केला ‘हा’ धक्कादायक खुलासा!

‘या’ कंपनीचे शेअर्स घेतलेले गुंतवणूकदार सहा महिन्यांत झाले बक्कळ मालामाल!