पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेक, वाचा काय आहे प्रकरण

पुणे | पिंपरी चिंचवडमध्येही राष्ट्रवादीने अर्धवट कामाच्या मुद्यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमावरुन पिंपरी चिंचवडमध्ये वातावरण चांगलंच पेटल्याचं पहायला मिळालं.

पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ पहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेले असताना हा सर्व प्रकार घडला.

पिंपरी चिंचवडमध्ये राडा होत असल्यामुळे पोलिसांना थोडा लाढीचार्जही करावा लागला. त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळल्याचं पहायला मिळालं.

अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनाला आले असता गर्दीतून एका अज्ञाताने देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पर भिरकावल्याची घटना घडली. यावरुन कार्यकर्त्यांमध्ये तुंबड हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकणारी व्यक्ती कोण आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. त्याविषयी पोलीस चौकशी करत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या या सर्व प्रकारावर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  IPL 2022 चं बिगुल वाजलं: कोणाचा सामना कोणाशी होणार?, वाचा एका क्लिकवर

  “ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त”

  “पंतप्रधान मोदीच देव असल्यासारखं भाजपचं वर्तन” 

  “82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत…”

  पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एका क्लिकवर