नवी दिल्ली | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या सर्वांनाच चटका लावून गेली. सुशांतच्या मृत्युनंतर आत्महत्येच्या अनेक घटना कानावर पडत असताना आता टिकटाॅक स्टार सिया कक्करनेही आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
दिल्ली मधील प्रीत विहार येथील सियाच्या राहत्या घरी बुधवारी हा धक्कादायक प्रकार आढळून आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ पहायला मिळाली.
टिक टॉकवर 1.1 मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या सिया कक्करनं वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊलं उचललं आहे. रियाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी पोलिसांकडून आता याचा तपास केला जात आहे.
‘मीट ब्रदर्स’ यांनी सियाच्या आत्महत्येवर शोक व्यक्त केला आहे. सध्या अनेक लोक आत्महत्या करत असल्याचं समोर येत आहे. हे अत्यंत दुखःद आहे. याप्रकारचं टोकाचं पाऊल उचलण्याआधी अशा तणावग्रस्त व्यक्तीनं कोणाचीतरी मदत घेतली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
-कोरोनाच्या औषधाबाबत राजेश टोपे यांनी दिली सर्वात मोठी गुडन्यूज!
-रेल्वे कधी रुळावर येणार?, रेल्वे बोर्डानं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय