टिपू सुलतान हा ‘मुस्लिम गुंड’ म्हणणाऱ्या नेत्याला जीभ कापून टाकण्याची धमकी

बंगळूर | कर्नाटकात भाजपचे राज्य आहे. तेथील भाजप आमदार के एस ईशवरप्पा (K. S. Eshwarappa) यांनी वादग्रस्त वक्तव्य केेले आहे. त्यांनी टिपू सुलतानचा (Tipu Sultan) उल्लेख ‘मुस्लिम गुंड’ असा केला आहे. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात होणार आहे.

तसेच त्यांच्या या कथनाचा दुसरा भाग म्हणजे, त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांंची जीभ कापून टाकण्याचे त्यांना धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रात त्यांना मिळालेली धमकी मोठी असल्याने आता वाद चिघळला आहे.

पुन्हा जर का टिपू सुलतानचा उल्लेख मुस्लिम गुंड म्हणून केला, तर जीभ कापून टाकू, असा इशारा त्यांना पत्रातून मिळाला आहे. हे पत्र त्यांना त्यांच्या निवासस्थानी प्राप्त झाले आहे.

कर्नाटकात स्वांत्र्यदिनाच्या दिवशी स्वा. वि. दा. सावरकर (V. D. Savarkar) आणि टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचे पोस्टर लावल्याने वाद झाला होता. यावेळी एका इसमावर प्राणघातक हल्ला देखील झाला होता.

यावर के. एस. ईश्वरप्पा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण कोणालही मुस्लिम गुंड म्हंटलेले नाही आणि त्यामुळे मी कोणाच्याही कोणत्याही धमकीला घाबरत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

शिवमोग्गा येथे सावरकर आणि टिपू सुलतान यांच्या पोस्टरवरुन वाद झाला होता. त्यावर ईश्वरप्पा बोलत होते. कर्नाटक येथे शिवमोगा येथे अल्पसंख्यांकामुळे जातीय तेढ निर्माण झाली, असा आरोप त्यांनी केला.

मला मुस्लिम समाजातील ज्येष्ठांना सांगायचे आहे की, सर्वच मुस्लिम गुंड नाहीत. मुस्लिम समाजातील लोकांनी भुतकाळात समाजात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

तसेच गुंडगिरीत सहभागी होणाऱ्या तरुणांना त्यांनी मार्गदर्शन करावे, असा माझा सल्ला आहे, असे ईश्वरप्पा म्हणाले. अन्यथा सरकार यावर कारवाई करेल, असेही ईश्वरप्पा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांची नोटीस

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने कोर्टात दाखल केली याचिका

राज्यात विविध अशा 75,000 पदांसाठी भरती होणार, वाचा सविस्तर वृत्त

दिल्लीत ऑपरेशन लोटस?; आम आदमी पक्षाचे अनेक आमदार संपर्काच्या बाहेर

उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका, “भाजप पक्ष नाही तर…”